Wednesday, March 10, 2021

साहेबाची मीटिंग

        साहेबाच्या मागे भरपूर मिटिंग.. ...कामाच्या व्यापामुळे  काही मीटिंग साहेब विसरून जातो.....साहेबाच्या  खुर्चीच्या समोरच्या फळ्यावर पुढच्या  मीटिंग  ,कार्यक्रम वगैरे लिहिण्याची फॅशन  साहेब जॉईन  झाल्यापासून 5-6 दिवसात बंद पडते.

मीटिंग चा agenda येऊन पडतो... मरणामातीचे विषय... नेहमीप्रमाणे agenda आल्यानंतर तयारीला सुरुवात! मागची मीटिंग झाल्यापासून महिनाभर  पाट्या टाकणे भानगडी सोडविणेकुटाने मिटविणे,आंदोलनउपोषण,   आमदारमंत्रीउदघाटन प्रोटोकॉल ,कमिट्यादुष्काळपूरपाणी पाऊसधंदापाणी,   पार्ट्या अध्यात्म  वगैरे यातच गेला... मग मिटिंगसाठी कर्मचारी  कसले तरी report आणून टाकतेतकाही बिचारे  तर आकडे बदलायची पण तसदी  घेत नाहीत ,काही अंदाजेच आकडे हाणून टाकतेत...काही काही विषय तर फक्त साहेबालाच   माहीत असतात... त्याचा बाकीच्या स्टाफ ला गंध पण नसतो!! शेवटी जमेल त्या पत्रावळ्या  बांधून घेऊन साहेब मीटिंग ला निघतो...मीटिंग सुरू होण्यापूर्वी साहेब डायरी उचकुन बघतोसाहजिकच ती मागच्या मीटिंग नंतर थेट आजच उचकलेली असते!! साहेबाला वाटत जरा 2-4  दिवस आधी  डायरी उचकुन बघितलीअसती  तर जरा बरं झालं असतं.... मीटिंग सुरू होते...

मग एका एका विषयाच्या आढाव्याला सुरुवात होते. मीटिंग घेणारा साहेब मुद्देसूद मीटिंग घ्यायला लागला तर मग खालच्या साहेबांच्या फ्युज उडायला सुरुवात होते.. एक तर मिटींगला आणलेल्या पत्रावळ्यामध्ये जे  पाहिजे ते सोडून बाकी सगळं सापडतं!! साहेबाने काही विचारलं की नुसते पानं  चाळायचे...काही सापडणार नाही हे माहिती असतंय तरी acting करायची!!..नाहीतर गुपचूप चोरासारखं इकडं तिकडं बघून खाली  वाकून संबंधित कर्मचाऱ्याला फोन करून   आकडे माहिती घेण्याचा प्रयत्न चालू असतो पण त्याचा फारसा उपयोग होत नाही!!आढावा घेणारा साहेब विचारत असतो अमुक विषयात आपला performance खूपच खराब आहे( तसा सगळ्याच विषयात खराबच असतो!!) तर आपला साहेब सांगणार साहेब आम्ही सगळं नियोजन केलेलं आहेसगळ्यांना सूचना दिल्या आहेतबऱ्यापैकी काम झालं आहेथोडंच राहील आहे, 100%  करून घेतो असली काहीतरी मोघमछाप उत्तरे देण्याचा कार्यक्रम चालू असतोपण याच साहेबाला जेंव्हा याचे  फिल्डवरील कर्मचारी असली मोघम उत्तरे देतात तेंव्हा ती त्याला मुळीच आवडत नाहीत!!!

त्यात पुन्हा आढावा घेणाऱ्या साहेब आणि आढावा देणारा साहेब यांचे आकडे एकमेकांशी कधीच जुळत नाहीतआणि हा जर विषय  वेळीच गांभीर्याने घेतला नाही तर अजून किमान 50 वर्ष ह्या दोघांचे आकडे जुळण्याची सुतराम शक्यता नाही( शासनाने यासंबंधी एखादा अभ्यासगट नेमण्याची गरज आहेपण त्या अभ्यासगटामध्ये पुन्हा असलेच साहेब घेणे कटाक्षाने टाळले पाहिजे!). बरं आकडे जुळले नाही की  साहेब सांगणार आम्ही online केलं होत पण दिसतच  नाही, technical problem आलाअपलोड झालं नाहीकस काय दिसेना तेच समजेना असल्या दयनीय ,केविलवाण्या ,कालबाह्य कारणांचा आधार घ्यायला सुद्धा साहेब मागे पुढे पाहत नाही.

प्रत्येक विषयाच्या आढाव्यात हेच.. करून घेतोघेतो करूनपाहून घेतोलक्ष घालतो(एवढ्या दिवस लक्ष कुठं होत हे विचारायचं नाही!)वगैरे वगैरे....

बऱ्याच विषयांबाबत साहेब बिनधास्त सांगून टाकतो दोन दिवसात करून घेतो... अख्खा महिना गेला तेंव्हा याला जमलं नाही आणि आता दोन दिवसात काय तिर मारणार ते साहेबाला माहिती...हे असले बरेच विषय दोन दिवसात संपवतो म्हणणाऱ्या सुपरमॅन साहेबांची कार्यक्षमता तपासण्यासाठी एकदा आढावा घेणाऱ्या साहेबाने यांची तिसऱ्या दिवशी मीटिंग घेतलीच पाहिजे!! त्याशिवाय ही दोन दिवसात करून घेतो म्हणण्याची अनिष्ट प्रथा समाप्त होणार नाही... पण आढावा घेणारा साहेब पण यांची कार्यक्षमता तपासण्याची रिस्क घेत #2344;ाही(शेवटी तो पण साहेबच!!)...

काही विषयामध्ये शून्य कामगिरी असते पण एखादा साहेब अमुक करताना तमुक technical problem येतो असं काहीतरी खुसपट काढतो ...वरच्या साहेबाला पण काय समजत नाही.. मग वरचा साहेब  पण वेळ मारून नेण्यासाठी म्हणतो ठिक हेदोन दिवसात करून घ्या... त्यामुळे बाकीच्या साहेबांवर आलेली संक्रात टळते...

एवढं सगळं होऊन एखादा तरी विषय असा असतो की त्यात साहेबाचा performance बाकीच्यांपेक्षा जरा  बरा असतो पण नेमकं त्याच  वेळी आढावा घेणारा साहेब म्हणतो मी काय आज या  विषयाचा आढावा घेत बसणार नाहीजे राहिले त्यांनी लवकर विषय संपून टाका!! आता सांगा साहेबानी  करायचं तरी काय....

प्रत्येक विषयाचा आढावा घेताना साहेब नमूद करतो की या विषयाचा वरच्या पातळीवरून प्रचंड फॉलोअप  सुरू आहेतमला स्वतःला showcause नोटीस आली, DO आला वगैरे.... थोडक्यात आढावा घेणाऱ्या साहेबाच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की मला नका घाबरू पण किमान माझ्या वरच्या साहेबाला तरी घाबरून काम होईलपण त्याचा विशेष उपयोग होत नाही!!

असे प्रत्येक विषयामध्ये साहेबाची विकेट जात जात मीटिंग संपण्याची वेळ झालेली असते. एव्हाना  सगळ्या साहेबाना बायकांचे (स्वतःच्या) फोन  सुरू झालेले असतातजेवायला येणार का वगैरे वगैरेआढावा घेणाऱ्या साहेबाला पण फोन येत असतो पण तो बायकोचा फोन आहे असं समजू नये म्हणून त्याच्या वरच्या  साहेबाला बोलल्याची acting करतो.. काही अतीऍक्टिव्ह साहेब घरून निघतानाच आज उशीर होणार अस सांगून पुढचं 'नियोजनकरून मीटिंगला  निघतात.....मीटिंग सुटल्या सुटल्या कुजबुज सुरू होते लै काम  आहे राव आपल्याला ,कस एवढं manage करायचं वगैरे वगैरे...मग सगळे साहेब मार्गस्थ होतात... काही श्रमपरिहारस्थळाकडे तर काही  घराकडे... पुन्हा एकदा नव्या उमेदीने... पुढच्या मीटिंग ला चांगली तयारी करू असा निश्चय करून.... पण पुन्हा पुढच्या मीटिंग ला तीच बोंब... बदलीपर्यंत तेच...बदली झाली तरी तेच

 

 गोविंद खामकर

1 comment:

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...