Thursday, March 4, 2021

शिपाई साहेब

 राहुरीचा गुरुवारी बाजार!!! ऑफिस मध्ये फुल्ल गर्दी!! त्यात आज कालच्या नोकऱ्यांमध्ये मिटिंग, VC, आढावेचौकशाउपोषण,आंदोलन,बहिष्कार, ,प्रोटोकॉल,पंचनामेपोस्टिंग  आणि कोंबडे हाणून हाणून साहेब पार बेजार झालाय. एवढं सगळा राडा  चाललेलं असताना कार्यालयातील शिपायाला  पाहून  साहेबाला   साहेब होण्याचा निर्णय घेऊन चुकल्यासारखं वाटत!!

शिपायाला ना मीटिंग ना भानगडीत्याला ना प्रोमोशन ची चिंता ना डीमोशनच भीतीब्रह्मदेव आला तरी त्याच डीमोशन करू शकत नाही!!चांगलं काम केलं तरी शिपाईचखराब केलं तरी शिपाईच! बदली झाली तरी काम तेचकारवाई करायची झाली तरी जबाबदारी  नसलेल्यावर कोणती जबाबदारी निश्चित करायची?? निलंबन केलं तर लगेच दुसरा नगाला नग कुठून आणायचा ?? 

बरं तुलनाच करायची झाली तर   शिपाईसाहेबांच्या   पगारापेक्षा साहेबांचं पगार दुप्पट पण नाही. कार्यालयात १४ हजारावर १४  तास काम करणारे  -४ कंत्राटी कर्मचार्यांचा एकत्रित पगार शिपायाएवढा!! एखाद्या खाजगी company मधल्या  अर्ध्या साहेबांचं पगार सुद्धा सिनियर शिपाईसाहेबापेक्षा कमीच!! बरं  काम काय तर साहेबांनी गंठी वाजवली तर ह्याला त्याला बोलविणे(ते पण साहेब ऑफिसात असला तर!!,साहेबाने वाजवलेल्या प्रत्त्येक घंटीमागे  साधारणपणे १०० रुपये शासन शिपायाला देत असेल!!!), थोडं फार टपाल इकडे तिकडे नेणे साफसफाईच काम यांनी बऱ्यापैकी Outsource केलेलं आहे ....

त्यात पुन्हा साहेबांचा शिपाई म्हणलं तर त्याला साहेब सोडून बाकीचे शक्यतो दुसरे कोणी काम सांगत नाही. साहेबांचे आणि शिपायाचे कसलेही संबंध असले तरी साहेब शिपायच सगळं ऐकतो(तस तर साहेब सगळ्यांचंच ऐकतो!!) हे बाकीच्या स्टाफ च्या डोक्यात फिट असतंय....त्यामुळे तो साहेबांचा शिपाई असला तर बाकीच्यांचा तो साहेबच असतो. त्यामुळे शिपायांमध्ये पण साहेबांचा शिपाई ही क्रिम पोस्टिंग आहे.

दिवसभर निवांत ,शांत चित्ताने संध्याकाळी 6:00 वाजायची वाट बघत शिपाई राहू शकतो . ना शुगर ना बीपी... (साहेबांची sugar लेवल  म्हणजे साखर कारखाना टाकता येईल  एवढी)... नंतर अवांतर उद्योग करायला मोकळा. एकदा त्यानी कार्यालय सोडलं की त्याला कोणी फोन पण करत नाही आणि केला आणि त्यानी उचलला नाही तरी पण साहेब त्याच विशेष काही करू शकत नाही!! आयुष्यात अजून काय पाहिजे....

  शिपाई पदाच सर्वात जास्त आकर्षण कोणाला असेल तर त्याच्या साहेबाला!! बरेच साहेब ज्यांना बाकीच्या गोष्टीत लै interst नाही ते साहेबाच्या पगारात शिपायचे काम करू शकतेतपण तशी offer त्यांना कोणी देत नाही....बर साहेबाला शिपाई होण्याचं  सुख पाहिजेच असलं तरी साहेबांचं किती demotion केल तरी त्याला शिपाई कोणी करणार नाही!!

त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फार महत्वाचे आहेआपली एखादी चूक सुद्धा आपल्याला शिपाई न करता साहेब बनवू शकते जे आयुष्यभर भोगावे लागते.....

म्हणूनच शिपायांचा साहेब होण्यापेक्षा साहेबांचा शिपाई म्हणजेच शिपाईसाहेब व्हा!! आपलं आयुष्यच बदलून जाऊ शकते...

 

- गोविंद खामकर

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...