Monday, March 16, 2026

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत)

प्रोटोकॉल ह एक बहुअर्थी, बहुआयामी  इंग्रजी शब्द आहे  आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या आपल्या सोयीने या शब्दाचा अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य इंग्रजांनी भारतीयांना बहाल केले आहे. तस तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हा शब्द वेळोवेळी कानावर पडायचा आणि त्यातून शिस्तबद्ध असा अर्थ सुद्धा निघायचा. पण प्रशासनात अथवा शासनात ज्याला इंग्रजीचे पाच पन्नास शब्द माहीत नसतील त्यालासुद्धा या  शब्दाचा अर्थ समजतो.   प्रोटोकॉल शब्दाचा साधारणपणे अर्थ विशिष्ट परिस्थितीमध्ये कसे वागावे याचे नियम असा आहे परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी यांना नुसता प्रोटोकॉल शब्द ऐकला तरी धडकी भरते!! त्याची कारणेही तशीच आहेत. 
बऱ्याचदा शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना “ तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का” अथवा तत्सम अर्थाचे वाक्यप्रयोग  नेहमीच ऐकायला मिळतात. बर हे विचारणाऱ्यांची तोंड पाहता याना हा शब्द कसा माहिती झाला असेल हा प्रश्न पडतो!! परंतु  खरच एकदा तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का अस विचारणाऱ्यांच्या तोंडावर  एकदा “ हो, नाही समजत..जरा समजाऊन सांगाल का?” असा प्रतिप्रश्न फेकून मारला पाहिजे. मी अनुभवावरून सांगू शकतो या प्रश्नाला उत्तरच नाही!! फक्त प्रतिप्रश्न करण्याची liberty नसल्यामुळे विचारणाऱ्यांचा  आत्मविश्वास वाढला आहे!!! स्पष्टच शब्दात बोलायच म्हटलं तर protocol सारखा रिकामा धंदा नाही फक्त बोलण्याची सोय नाही एवढच!(काही  अपवाद वगळता!!).  दिवसभर प्रोटोकॉलवर असलेल्या अधिकारी कर्मचारी हा कधीही आज दिवसभर काय काम केलं याचा याचा तो हिशोब देऊ शकत नाही. एवढच नाही तर प्रोटोकॉलवर असणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कोणीही  वरिष्ठ  त्याला इतर काम सांगून शक्यतो disturb करत नाही(हा सुद्धा एक प्रोटोकॉलच आहे!). या प्रोटोकॉलच्या निमित्ताने जो संपर्क अधिकारी आहे तो सुद्धा  त्याची नियमित करत असलेली महत्वाची कामे, विषय यांना फाट्यावर मारून तो दिवस काढत असतो.
आपल्या जिल्ह्यात ,तालुक्यात एखादे वरिष्ठ , उच्चपदस्थ अथवा तत्सम कोणी दौऱ्याला येणार असेल तर त्यांच्यासोबत पूर्ण वेळ फिरवायला एक बळीचा बकरा तथा संपर्क अधिकारी शोधला जातो. हा मान शक्यतो ज्या विभागाचे वरिष्ठ आहेत त्या विभागातील अधिकाऱ्याला दिला जातो.  विभाग मोठा असेल तर शक्यतो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आलटून पालटून हा मान( मान कापून!) दिला जातो.  दौरा  जर  सुट्टीच्या दिवशी आला तर मात्र संपर्क अधिकाऱ्याच काही खरं नाही! बिचारा एकटाच रिकामा फिरत  असतो, त्याचे कर्मचारीसुद्धा त्याचा फोन उचलत नाहीत!! याचं मुख्य काम म्हणजे  दौऱ्याला येणाऱ्या वरिष्ठांच्या संपर्कात राहून त्याप्रमाणे पुढील यंत्रणेला सुचित करणे. इतर ‘अनुषंगिक’  व्यवस्था सुद्धा ओघाने याच महाशयांच्या गळ्यात येते. मग हे महाशय सुद्धा त्यांच्या खालच्या कोणाला तरी बकरा करुन त्याच्या गळयामध्ये ते व्यवस्थेचं प्रकरण सोपवून देतो. साहजिकच हा बकरा बकरीचा खेळ प्रशासनातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन थांबतो(हेच खरे बळी!). 
या दौऱ्यांच आणखी एक वैशिष्ठ्य अस की जेवढे मोठे वरीष्ठ  दौऱ्यावर येतात तेवढे मोठ मोठे  अधिकारी या दौऱ्यामध्ये  रिकामे फिरत असतात.  काही सन्ममानीय अपवाद वगळता या दौऱ्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या presence हा फक्त वरिष्ठांचा ego सांभाळण्यापुरता मर्यादित असतो.  वाईट अवस्था तर पोलीस विभागाची!! आपण  नवरदेवाला तू लग्नाला येणार आहे का अस कधीही विचारात नाही  अगदी तसेच पोलीसांना वेगळ्याने दौऱ्यामध्ये समाविष्ट व्हा असे सांगण्याची आवश्यकता नसते. माझ्या मते या प्रोटोकॉलच्या भानगडीत सर्वात जास्त पोलिस खाते होरपळून निघते. आधीच कमी मनुष्यबळामध्ये असंख्य कामे करायची असताना हे रिकामे उद्योग करताना किती patience ठेवावे लागत असतील? त्यात पुन्हा एखाद्या पोलिसाने आज दिवसभरात किती बंदोबस्त केला याचे मोजमापही करता येत नाही!!
       या दौऱ्यामध्ये येणारा खर्च कोणत्या हेड वर टाकायचा हे अद्याप न सुटलेले कोडे आहे. हा विचार कोणाच्याच डोक्यात तथा हेड मध्ये येत नाही हे पण समजत नाही. एखाद्या संविधानिक पदावरील वरिष्ठांचा दौरा  खालच्या यंत्रणेला एवढा गृहीत धरून कसा असू शकतो हे समजणे मुश्किल आहे. बर वरिष्ठांचे जाऊद्याहो, त्यांच्या किटल्याच आपल्याला सुधरुन देत नाहीत!! एकदा आमच्याकडे येत असलेल्या वरिष्ठांना केवळ २५० ml च्या बिसलेरी मधून पाणी प्यायला लागते असे त्यांच्या सहायकाने सांगितले  त्या प्रकारातील बॉटल आमची माणस रात्रभर  दुकानांमध्ये शोधत होती!! या प्रोटोकॉलच्या किस्स्यांचे एखादे स्वतंत्र पुस्तक निघू शकेल एवढे पराक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने व संमतीने इथे घडलेले आहेत!
एखादा शासकीय,निमशासकीय कार्यक्रम आयोजित करताना सुद्धा  हा प्रोटोकॉल सांभाळताना अधिकाऱ्यांच्या नक्की नऊ येतात. यामध्ये मुख्य कार्यक्रमाच्या नियोजनापेक्षा कोण अध्यक्ष, कोण उद्घाटक, कोणाच नाव वर, कोणाच खाली, कोण कुठे बसणार,याच नाव का नाही असल्या भानगडीमध्ये साहेब पुरता बेजार होऊन जातो. इथे सुद्धा प्रत्येकजण साहेबाला प्रोटोकॉल शिकवत असतो. त्यामुळे इच्छा असूनसुद्धा अधिकारी बरेच चांगले कार्यक्रम प्रोटोकॉलची भानगड नको म्हणून घेण्याचं टाळतात. कधी कधी वाटत हे उद्घाटन, लोकार्पण आणि तत्सम प्रकारातील कार्यक्रमाच बंद केले पाहिजे. सगळी कामे जर शासनच करत असेल तर एवढी प्रशासकीय यंत्रणा दावणीला बांधून हे कार्यक्रम करून पुन्हा काय साध्य करायचं आहे हा प्रश्नच आहे. साहजिकच मला निवडणुकीला सामोर जायच असेल तर वरील मत मांडणाऱ्या व्यक्तीला मीच सर्वात आधी मूर्ख म्हणेल!! 
प्रोटोकॉल या शब्द किती शब्दांना समानार्थी असेल हे इंग्रजांपेक्षा भारतीयांना जास्त कळत असेल.   म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हणाल तर “चहा पाणी” या शब्दाचा समानार्थी शब्द प्रोटोकॉल कसा असू शकतो हे सामान्य बुद्धीला न पटणारं कार्य प्रशासनाने करून दाखवलेले आहे. खालच्या कार्यालयातील चहा पाणी हे वरिष्ठ कार्यालयातील प्रोटोकॉल असते!!वरिष्ठ कार्यालयात अडलेली, रखडलेली कामे, बदल्या इत्यादी बाबतीत प्रोटोकॉल शब्दाला एक वेगळ status आहे. सरळ सरळ न बोलता प्रोटोकॉल शब्दाचा वापर करणाऱ्यांना मुरब्बी, पट्टिचे आणि well mannered समजल जाते. 
साहजिकच या प्रोटोकॉल शब्दाची चर्चा करावी तितकी थोडी आहे, प्रोटोकॉल हेच एक दीर्घ पुराण आहे. यावर संशोधन करून यावर एखादी सर्वकष मार्गदर्शिका निघू शकते का यावर विचार करायला पाहिजे त्यामुळे दैनंदिन काम करणे या निमित्ताने अजून सोयीचे होईल. पण पुन्हा ही शंका येते की कदाचित बऱ्याच तज्ञांनी हा विषय हाताळायला घेतला असावा आणि त्याच्या आवाक्याचा अंदाज घेऊन पुन्हा विषय सोडून दिला असावा.!! असो यासाठी पुन्हा शुभेच्छा !!


टिप: सदर लिखाणामध्ये मध्ये नमूद कार्यालये ही महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीत, असल्यास निव्वळ योगायोग मानावा. चहा पाणी या शब्दाचा अर्थ पेय आणि खाद्यपदार्थ या प्रकारातील घ्यावा.

विशेष टिप:
(टीप:  'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व लेख   https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)





Sunday, May 26, 2024

नवीन साहेब


बदल्यांचा सिजन संपलेला असतो. नवीन ठिकाणी पोस्टिंग झालेला साहेब कार्यालयात रुजू होण्याआधीच काही अतिउत्साही मंडळी साहेबाला फोन करून साहेब कधी येणार, कसे येणार असल्या व्यर्थ गोष्टी अनास्थेने पण आस्तेवाईकपणे विचारतात! साहेबाला पण बरं वाटत!! ऑफिसचा पहिला दिवस...साहेब बरोबर वेळेवर पोहचतो!!  साहेब कार्यलयात येताच शिपाईसाहेब धुडूधुडू पळत येऊन साहेबाच्या गाडीचा दरवाजा उघडून साहेबाच्या हातातली बॅग ,डायरी अक्षरशः हिसकून घेऊन साहेबाच्या पुढे जाऊन साहेबाच्या टेबल वर पोहच करतो.  मग सत्कार , बुके,फेटे ,  शाली, श्रीफळ, नमस्कार,चमत्कार यांचा पाऊस!! कोण येतंय कोण जातंय साहेबाला मेळ लागत नसतो पण बळच हसून फोटो घ्यायचा कार्यक्रम सुरू असतो.  हा कार्यक्रम दोन चार दिवस  चालू असतो मग साहेब काम इतर कोणते महत्वाचे काम नसल्यामुळे  कामाकडे मोर्चा वळवतो.  मग कर्मचाऱ्यांचा आढावा , बैठका ..त्यामध्ये कर्मचारी पण साहेबाला बरं वाटावं म्हणून घाबरल्यासारखं दाखवतात, साहेबाला पण बरं वाटत !! एखाद्याच लक्षण जरा बरं वाटलं नाही तर साहेब त्याला नोटीस काढतो, या नोटिसचा काहीच उपयोग होणार नाही हे त्या कर्मचाऱ्याला आणि साहेबाला पक्के माहीत असतंय पण दुसरं करणार तरी काय??!साहेब एकदम ideal  विचार सगळ्यांसमोर मांडत असतो.मी किती शिस्तप्रिय आहे सगळ्यांना सांगत असतो . यापूर्वी साहेब जिथे होता तिथलं प्रशासन त्यानी कस दोरीत आणलं, जुन्या ठिकाणी काय काय दिवे लावले,तिकडे कसं वाळवंट होत आता कसं अमेझॉनच फॉरेस्ट करून टाकलंय सगळं वगैरे वगैरे असले कल्पक  उदाहरणं देत असतो. पण काही दर्दी मंडळींनी साहेबाच्या जुन्या पोस्टिंगमधल्या कला,कारनामे , कुटाने, किस्से  साहेब जॉईन होण्यापूर्वीच जनहितार्थ सगळ्यांपर्यंत पोहचवलेले असतात.!! तरी पण साहेब मी टिपनिशिवाय सही करीत नाही,प्रत्यक्ष  काम पाहिल्याशिवाय बिल काढणार नाही, टपाल मी पाहिल्याशिवाय संबंधित टेबलावर पाठवायचे नाही वगैरे वगैरे stunt चालूच ठेवतो. साहेबांची धडक कारवाई, कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असल काहीतरी पेपर मध्ये छापून येत असतंय! एकंदरीतच आता खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळणार, विकास होणार अस वातावरण तयार झाल्याचा भास निर्माण झालेला असतो.        पण आता साहेब नवीन राहिला नाही! साहेबाला काम उरकेना.. नुसता  ideal approach चा stunt मारल्यामुळे pendency भरपूर वाढली... सुरुवातीला साहेब नवीन आहे नवीन आहे म्हणून लोक ऐकून घेत होते पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता दररोज कुणीपन येऊन साहेबाला चेक मेट करायला लागलंय. एकंदरितच परिस्थिती हाताबाहेर चाललेली असते. अशा प्रकारे सुप्रशासनाचा उत्तम नमुना बनण्याचा चंग बांधलेला साहेब कोंबडशाहीमध्ये रूपांतरित होतो आणि सुरु होत एक नवीन पर्व: दिसला शिक्का की हान कोंबडा!!( जसा मागच्या पोस्टिंग च्या वेळेस झाला होता तसाच, मग कशाला प्रयत्न करायचा?!!). मग प्रशासन तर गतिमान होणारच. त्यातली त्यात तेच तेच तक्रारकर्ते दररोज येऊन साहेबाच्या डोक्याचं दही करतेत, प्रश्न तर सुटत नाहीतच... मग हे शिस्तप्रियसाहेब ऑफिसात कधी येतेत कधी जातेत काहीच मेळ लागत नाही.. साहेबाचा performance  चांगलाच घसरत जातो(नेहमीप्रमाने). साहेबाचे कर्मचारी पण साहेबांचं लै मनावर घेत नाहीत. एरवी पहिल्या ring ला फोन उचलणारे काही मुजोर कर्मचारी(obiviously हा मुजोरपणा साहेबांच्या पुण्याईमुळेच!!!)आता साहेबांचा missed call पडला तरी call back करीत नाही. ह्या सगळ्याला वैतागून साहेब चिडचिड करतो पण काय उपयोग होत नाही,उलट एखादा कामचुकार कार्यकर्ता साहेबाला म्हणतो : कशाला लोड घेता साहेब? आता काय बोलणार? एकंदरीत ही परिस्थिती बदली करण्यासाठी अनुकूल झालेली आहे. Now Saheb trying  for transfer  desperately( म्हणजे join झाल्यापासून एक वर्ष साहेब नवीन आहे नवीन आहे अस म्हणत जाणार आणि शेवटचं वर्ष साहेब जाणार आहे जाणार आहे अस करून जाणार ..आणि मधल्या  काळात  विकास,जनकल्याण, अमेझॉनचं फॉरेस्ट असल्या  अंधश्रद्धा वगैरे वगैरे).  पण बदली काय अशीच होत नाही. शेवटच्या overs बाकी असतात आणि  runrate खूप वाढला आहे!! एरवी नियमाच्या चाकोरीत चालणारा साहेब आता एकदम customise  झालेला असतो. शॉट चुकीचा गेला तरी चालेल पण स्कोर वाढला पाहिजे हे डोक्यात, ह्या नादात भरपूर चुकीचे शॉट जातेत पण साहेबांच लक्ष नसतंय... score वाढवण्याच्या नादात साहेब पुढच्या येणाऱ्या साहेबांच्या वाट्याच्या 2-4 match च्या runs पणठोकून काढतो...मग एकदाची बदली होते आणि साहेब एकदाचा सुटतो. हा साहेब सुटण्याचा आणि नवीन साहेब join होण्याचा मधला सुवर्णकाळ भेदण्यासाठी त्याच कार्यालयातील चार्जोत्सुक ज्युनिअर साहेब पण तयारच असतो...जुना साहेब नवीन ठिकाणी नवीन साहेब होण्याच्या तयारीत रवाना होतो... पुन्हा नवीन साहेब,नवीन ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा , नवीन कला, नवे कुटाने, नवे कारनामे, नवीन किस्से , नवीन वाळवंट, नवीन फॉरेस्ट, नवीन विकास....पुन्हा एकदा भ्रमनिरास!!!....जनहितार्थ
(वरील लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने व अतिशय मर्यादित अनुभवावर आधारित आहे. यामधून कोणत्याही अधिकाऱ्यांच्या मनाला ठेच लागावी असा मुळीच उद्देश नाही. तसेच सर्व कर्मचारीवर्ग , परिचर वर्ग यांचा पूर्ण सन्मान  ठेऊन हे लिखाण आहे. तसेच उपरोक्त उल्लेखलेल्या साहेबाच्या पात्रामध्ये आपण स्वतःला प्रतिबिंबित न करता देखील हा लेख वाचण्याचे आपले स्वातंत्र्य अबाधित आहे!!! तसेच ज्यांना वाटतंय वरच्या साहेबांच्या कर्मचाऱ्यांच्या role  मध्ये आपण चपखल बसत आहोत त्यांनादेखील तसे  express  न करण्याची मुभा आहे) 
@गोविंद खामकर

 गोविंद खामकर

Friday, May 10, 2024

साईड पोस्टिंग लेख 23 वा: साईड पोस्टिंग ( 'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व 20 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत)

साईड पोस्टिंग ही प्रशासनाची  आध्यात्मिक शाखा आहे. लाल दिवे , नोकरचाकर, बंगले गाड्या , लोकसेवा , समाजसेवा हे सर्व मोहमाया आहे असे ज्यांना कळून चुकते ते अधिकारी या मार्गाकडे वळतात. खरं तर ही सगळी मोहमाया सोडून  आयुष्यभर साईड पोस्टिंगमधे रमणाऱ्या या ऋषीतुल्य महान व्यक्तीना साईड पोस्टिंग नावाच्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणून घोषित केले पाहिजे!!    ज्यांच्या आयुष्यात फक्त पगार हाच एकमेव incentive  शिल्लक राहतो अशी मंडळी या पोस्टिंगसाठी perfect असतात. अर्थात पगार हाच सर्व सरकारी नोकरांचा सर्वोच्च incentive असतो, उगीच लेखाच्या सुरवातीलाच गैरसमज नको!!
समान काम समान वेतन या तत्वाला मात्र या साईड पोस्टिंग  फाटा देताना दिसतात . तिकडे फिल्डवर रात्रंदिवस जीव तोडून( कधी कधी जीव जाईपर्यंत,) काम करणारे अधिकारी आणि इकडे ऑफिसलाच न जाणारे अधिकारी याना सारखाच पगार हे कसलं तत्त्व? असे असले तरीही कामाचा  प्रचंड ताण आहे म्हणून फिल्डवर सदा रडणारे अधिकारी साईड  पोस्टिंग  वाल्यांच्या विरुद्ध बंड पुकारताना दिसत नाहीत!!(याची कारणमीमांसा interesting असू शकते!!).
 मुळात साईड पोस्टींग हा प्रकार शासनामधे का आहे याचा आधी शोध घेतला पाहिजे. तशी शासनात कोणतीही पोस्टिंग officially साईड पोस्टिंग नसते पण तिथे जाणारे अधिकारी आपल्या ‘कर्तृत्वाने’ म्हणा किंवा शासनाने त्या पदासाठी  निश्चित केलेल्या  अल्प जबाबदारीमुळे असल्या पोस्टिंग तयार होतात.  अल्प किंवा शून्य visitors, बहुसंख्य जनतेला ती पोस्टच माहीत नसणे अथवा  असलं एखादं ऑफिस असतंय याची कल्पनाच नसणे अथवा  अधिकाऱ्याची त्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर सबंधित अधिकाऱ्याला स्वतःचे कार्यालय दिवसभर न सापडणे, वरिष्ठांकडून आढावा न होणे इ. हे साधारपणे साईड पोस्टिंग ठरविण्याचे parameters असू शकतात. 
बऱ्याचदा अशा posting शासनाकडून strategic पद्धतीने वापरल्या जातात. म्हणजे या  पोस्टची संख्या जरी कमी असेल तरी त्यांचा influence प्रचंड आहे.या पोस्टचा वापर किती बहुउद्देशीय असू शकतो याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.  जर एखादा अधिकारी व्यापक जनहित लक्षात घेऊन अथवा अगदी नोकरीच्या सुरवातीलाच देण्यात आलेल्या  training मधून inspire होऊन अगदी नियमाने काम करायला लागला आणि असे करताना तो कोणालाच दाद देत नसेल तर शासनसुद्धा व्यापक जनहित लक्षात घेऊन व केलेल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून अशा अधिकाऱ्याची बदली साईड पोस्टिंगला करत असते. अशावेळी शासन त्या अधिकाऱ्याचे  ‘पंख’ छाटण्याचे काम करत असते .(पंख छाटले तरी तो खऱ्या अर्थाने ‘मुक्त पक्षी’ होत असतो हे मात्र सत्य आहे!) .  काही अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग च नाव काढलं तरी uncomfortable वाटतं, सेवेप्रति असलेली प्रितीच म्हणावी लागेल, दुसर काय बोलणार!!  शासन अशा लोकाना सुद्धा सुखाने काम करू देत नाही, मग असे अधिकारी त्याना साईड पोस्टिंगला टाकू नये म्हणून कोणाचेतरी सावज बनतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या कामामध्ये कमालीचा बेजबाबदारपणा सातत्याने ठेवला असेल किंवा ज्या अधिकाऱ्याला कोणतीही वरिष्ठ अथवा बाह्य शक्ती त्याच्या नाकर्तेपणापासून विचलित करू शकत  नसेल अथवा जो अधिकारी फिल्डवरील अत्यंत जबाबदारीची पोस्टिंग देखील साईड पोस्टिंग सारखीच casually घेऊन आपले पगार घेण्याचे काम मात्र  इमानेइतबरे नित्यनियमाने आणि  जबाबदारीने पार पाडत असेल अशा अधिकाऱ्याना सुद्धा शासन साईड पोस्टिंगला टाकत असते. 

याउलट काही अधिकाऱ्यांना मात्र जीवनाचा खरा अर्थ समजलेला असतो, माणूस एकटा आला आहे एकटाच जाणार आहे, रिकाम्या हाती आला आहे रिकाम्या हातीच जाणार आहे हे principle सदा मनामध्ये ठेऊन सदा साईड पोस्टिंगसाठी आग्रही असतात. अशा अधिकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये   ‘पुढची  साईड पोस्टिंग कशी मिळवायची’  एवढं एक टेन्शन वगळता इतर कोणतही टेन्शन नसतंय. यांचं next पोस्टिंगच प्लानिंग एवढं advance असतंय की कोणाला काही समजायच्या आत हे पोस्टिंगचा कार्यक्रम करून मोकळे झालेले असतात!! बऱ्याचदा तर या साईड पोस्टिंग specialist अधिकाऱ्यांनी syndicate केल्यासारखं दिसतंय!! इकडला रिकामा तिकडे  बदली करणार आणि तिकडला रिकामा इकडे, बाकीच्यांना संधीच नाही!! बरेच वर्ष फिल्डवर काम केल्यामुळे एक दोन वर्ष साईड पोस्टिंगला  जाण्याची इच्छा असणाऱ्या अधिकाऱ्यांना हे side posting specialist syndicate लवकर मेळच लागू देत नाही..
 जे अधिकारी सतत   साईड पोस्टिंग घेतात ते स्वतःचा एक ब्रॅंड बनवत असतात. सतत साईड पोस्टिंग घेतल्याने  तेथील वातावरणाचे  प्रतिबिंब स्पष्टपणे या व्यक्तींच्या विचारांमध्ये व चेहऱ्यावर दिसत असते.  चेहरा नेहमी शांत आणि प्रसन्न! यांचे विचार आदर्शवादाशी समकक्ष होऊ लागतात, विचारांमध्ये स्पष्टता असते, आपण नेहमी नियमाच्या चाकोरीत राहून काम केले पाहिजे असा हट्ट!(अर्थात नियमात काम करण्यासाठी आधी काम पाहिजे आणि नियम तोडण्यासाठी तशी संधी पाहिजे.. हे दोन्ही साईड पोस्टिंगमधे नसते हा भाग वेगळा!!). असे अधिकारी स्वतःला साधारणपणे  मुख्य प्रवाहातील अधिकाऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.  कदाचित त्यांच्या पोस्टिंगवर कोणाचीही नजर पडू नये अशी अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये असावी असा माझा समज आहे. संघटना, आंदोलन, काम बंद , whatsapp वरील मतमतांतरे असल्या बिनकामाच्या गोष्टीमध्ये हे लोक बिलकुल रस घेत नाहीत. अशा प्रकारे आपल्या कर्तृत्वाने ते एक वेगळंच प्रशासकीय विश्व निर्माण करत असतात. 
   बदली ही शासनातील अपरिहार्य बाब असल्याने पोस्टिंगची उपलथापालथ चालू असते. एखादा अधिकारी वर्षानुवर्षे फिल्डवर काम करत असेल आणि त्याला अचानक साईड पोस्टिंगला टाकलं तर त्याची अवस्था सुद्धा विचित्र होते..दररोज यॉर्करवर खेळायची सवय असलेली खेळाडूला उचलून थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत फेकून दिल्यासारखा हा प्रकार आहे.  अशा  अनैसर्गिक स्थानांतरामुळे होणाऱ्या स्थित्यंतराचा सामना करण्यासाठी  अशा अधिकाऱ्याना मनसंतुलनाचे एखादं  प्रशिक्षण द्यायला हरकत नाही! हीच अवस्था साईड पोस्टिंग मधे वर्षानुवर्षे काम केलेल्या अधिकाऱ्याला अचानक फील्ड पोस्टिंगला टाकल्यावर होते.   साईड  पोस्टिंगच्या ऑफिसमध्ये  दिवसभर कुत्रसुद्धा फिरकत नव्हत आणि इथं आता दिवसभर श्वास घ्यायलासुद्धा वेळ नाही.! साईड पोस्टिंगच्या  ऑफिसमध्ये  नुसती शांतता , positive vibes etc… आणि इथं एवढा गदारोळ, गोंधळ की भूतं सुद्धा settle होताना चार वेळा विचार करत असतील अशी परिस्थिती!!  दिवसभर इतकं busy शेड्यूल की प्लॅनींग करायची भीती वाटते. प्रत्येक क्षणी कुठ येऊन पडलो ही भावना!!त्यामुळे शासनाने प्रथम या side posting identify  करुन notify केल्या पाहिजे. अशा पदावर काम करण्याची( अर्थात कामच न करण्याची!!) इच्छा असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून  अगदी सेवेमध्ये जॉइन होतानाच  preferance भरून घेतले पाहिजे - side posting की field आणि त्यानुसार त्यांना training द्यायला पाहिजे…नाहीतर नेपाळसोबत  लढण्यासाठी कशाला  राफेल विमाने तयार करायची? म्हणजे आपल्याला फिल्डवर काम करण्यासाठी  किती उच्च दर्जाचं training मिळत याचा  अंदाज  यावरून येतो, मात्र हे वाचून आपल्याला ट्रेनिंग देणाऱ्या  संस्थांचं (जाऊद्या  आता नाव नाही लिहीत..नाहीतर तिथले साईड पोस्टिंगवाले मारायला येतील!) उर भरुन आलं असेल…तथापि त्याना पुनश्च जमिनीवर लँड व्हायचे असल्यास सुलभ संदर्भासाठी याच साहेब सीरीजमधील ‘प्रशिक्षण’ या लेखाचे अध्ययन करावे…
©गोविंद खामकर
(टीप:  'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व लेख   https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)












Thursday, April 11, 2024

साईड पोस्टिंग लेख 23 वा: साईड पोस्टिंग ( 'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व 20 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत)

साईड पोस्टिंग ही प्रशासनाची  आध्यात्मिक शाखा आहे. लाल दिवे , नोकरचाकर, बंगले गाड्या , लोकसेवा , समाजसेवा हे सर्व मोहमाया आहे असे ज्यांना कळून चुकते ते अधिकारी या मार्गाकडे वळतात. खरं तर ही सगळी मोहमाया सोडून  आयुष्यभर साईड पोस्टिंगमधे रमणाऱ्या या ऋषीतुल्य महान व्यक्तीना साईड पोस्टिंग नावाच्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणून घोषित केले पाहिजे!!    ज्यांच्या आयुष्यात फक्त पगार हाच एकमेव incentive  शिल्लक राहतो अशी मंडळी या पोस्टिंगसाठी perfect असतात. अर्थात पगार हाच सर्व सरकारी नोकरांचा सर्वोच्च incentive असतो, उगीच लेखाच्या सुरवातीलाच गैरसमज नको!!
समान काम समान वेतन या तत्वाला मात्र या साईड पोस्टिंग  फाटा देताना दिसतात . तिकडे फिल्डवर रात्रंदिवस जीव तोडून( कधी कधी जीव जाईपर्यंत,) काम करणारे अधिकारी आणि इकडे ऑफिसलाच न जाणारे अधिकारी याना सारखाच पगार हे कसलं तत्त्व? असे असले तरीही कामाचा  प्रचंड ताण आहे म्हणून फिल्डवर सदा रडणारे अधिकारी साईड  पोस्टिंग  वाल्यांच्या विरुद्ध बंड पुकारताना दिसत नाहीत!!(याची कारणमीमांसा interesting असू शकते!!).
 मुळात साईड पोस्टींग हा प्रकार शासनामधे का आहे याचा आधी शोध घेतला पाहिजे. तशी शासनात कोणतीही पोस्टिंग officially साईड पोस्टिंग नसते पण तिथे जाणारे अधिकारी आपल्या ‘कर्तृत्वाने’ म्हणा किंवा शासनाने त्या पदासाठी  निश्चित केलेल्या  अल्प जबाबदारीमुळे असल्या पोस्टिंग तयार होतात.  अल्प किंवा शून्य visitors, बहुसंख्य जनतेला ती पोस्टच माहीत नसणे अथवा  असलं एखादं ऑफिस असतंय याची कल्पनाच नसणे अथवा  अधिकाऱ्याची त्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर सबंधित अधिकाऱ्याला स्वतःचे कार्यालय दिवसभर न सापडणे, वरिष्ठांकडून आढावा न होणे इ. हे साधारपणे साईड पोस्टिंग ठरविण्याचे parameters असू शकतात. 
बऱ्याचदा अशा posting शासनाकडून strategic पद्धतीने वापरल्या जातात. म्हणजे या  पोस्टची संख्या जरी कमी असेल तरी त्यांचा influence प्रचंड आहे.या पोस्टचा वापर किती बहुउद्देशीय असू शकतो याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.  जर एखादा अधिकारी व्यापक जनहित लक्षात घेऊन अथवा अगदी नोकरीच्या सुरवातीलाच देण्यात आलेल्या  training मधून inspire होऊन अगदी नियमाने काम करायला लागला आणि असे करताना तो कोणालाच दाद देत नसेल तर शासनसुद्धा व्यापक जनहित लक्षात घेऊन व केलेल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून अशा अधिकाऱ्याची बदली साईड पोस्टिंगला करत असते. अशावेळी शासन त्या अधिकाऱ्याचे  ‘पंख’ छाटण्याचे काम करत असते .(पंख छाटले तरी तो खऱ्या अर्थाने ‘मुक्त पक्षी’ होत असतो हे मात्र सत्य आहे!) .  काही अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग च नाव काढलं तरी uncomfortable वाटतं, सेवेप्रति असलेली प्रितीच म्हणावी लागेल, दुसर काय बोलणार!!  शासन अशा लोकाना सुद्धा सुखाने काम करू देत नाही, मग असे अधिकारी त्याना साईड पोस्टिंगला टाकू नये म्हणून कोणाचेतरी सावज बनतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या कामामध्ये कमालीचा बेजबाबदारपणा सातत्याने ठेवला असेल किंवा ज्या अधिकाऱ्याला कोणतीही वरिष्ठ अथवा बाह्य शक्ती त्याच्या नाकर्तेपणापासून विचलित करू शकत  नसेल अथवा जो अधिकारी फिल्डवरील अत्यंत जबाबदारीची पोस्टिंग देखील साईड पोस्टिंग सारखीच casually घेऊन आपले पगार घेण्याचे काम मात्र  इमानेइतबरे नित्यनियमाने आणि  जबाबदारीने पार पाडत असेल अशा अधिकाऱ्याना सुद्धा शासन साईड पोस्टिंगला टाकत असते. 

याउलट काही अधिकाऱ्यांना मात्र जीवनाचा खरा अर्थ समजलेला असतो, माणूस एकटा आला आहे एकटाच जाणार आहे, रिकाम्या हाती आला आहे रिकाम्या हातीच जाणार आहे हे principle सदा मनामध्ये ठेऊन सदा साईड पोस्टिंगसाठी आग्रही असतात. अशा अधिकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये   ‘पुढची  साईड पोस्टिंग कशी मिळवायची’  एवढं एक टेन्शन वगळता इतर कोणतही टेन्शन नसतंय. यांचं next पोस्टिंगच प्लानिंग एवढं advance असतंय की कोणाला काही समजायच्या आत हे पोस्टिंगचा कार्यक्रम करून मोकळे झालेले असतात!! बऱ्याचदा तर या साईड पोस्टिंग specialist अधिकाऱ्यांनी syndicate केल्यासारखं दिसतंय!! इकडला रिकामा तिकडे  बदली करणार आणि तिकडला रिकामा इकडे, बाकीच्यांना संधीच नाही!! बरेच वर्ष फिल्डवर काम केल्यामुळे एक दोन वर्ष साईड पोस्टिंगला  जाण्याची इच्छा असणाऱ्या अधिकाऱ्यांना हे side posting specialist syndicate लवकर मेळच लागू देत नाही..
 जे अधिकारी सतत   साईड पोस्टिंग घेतात ते स्वतःचा एक ब्रॅंड बनवत असतात. सतत साईड पोस्टिंग घेतल्याने  तेथील वातावरणाचे  प्रतिबिंब स्पष्टपणे या व्यक्तींच्या विचारांमध्ये व चेहऱ्यावर दिसत असते.  चेहरा नेहमी शांत आणि प्रसन्न! यांचे विचार आदर्शवादाशी समकक्ष होऊ लागतात, विचारांमध्ये स्पष्टता असते, आपण नेहमी नियमाच्या चाकोरीत राहून काम केले पाहिजे असा हट्ट!(अर्थात नियमात काम करण्यासाठी आधी काम पाहिजे आणि नियम तोडण्यासाठी तशी संधी पाहिजे.. हे दोन्ही साईड पोस्टिंगमधे नसते हा भाग वेगळा!!). असे अधिकारी स्वतःला साधारणपणे  मुख्य प्रवाहातील अधिकाऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.  कदाचित त्यांच्या पोस्टिंगवर कोणाचीही नजर पडू नये अशी अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये असावी असा माझा समज आहे. संघटना, आंदोलन, काम बंद , whatsapp वरील मतमतांतरे असल्या बिनकामाच्या गोष्टीमध्ये हे लोक बिलकुल रस घेत नाहीत. अशा प्रकारे आपल्या कर्तृत्वाने ते एक वेगळंच प्रशासकीय विश्व निर्माण करत असतात. 
   बदली ही शासनातील अपरिहार्य बाब असल्याने पोस्टिंगची उपलथापालथ चालू असते. एखादा अधिकारी वर्षानुवर्षे फिल्डवर काम करत असेल आणि त्याला अचानक साईड पोस्टिंगला टाकलं तर त्याची अवस्था सुद्धा विचित्र होते..दररोज यॉर्करवर खेळायची सवय असलेली खेळाडूला उचलून थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत फेकून दिल्यासारखा हा प्रकार आहे.  अशा  अनैसर्गिक स्थानांतरामुळे होणाऱ्या स्थित्यंतराचा सामना करण्यासाठी  अशा अधिकाऱ्याना मनसंतुलनाचे एखादं  प्रशिक्षण द्यायला हरकत नाही! हीच अवस्था साईड पोस्टिंग मधे वर्षानुवर्षे काम केलेल्या अधिकाऱ्याला अचानक फील्ड पोस्टिंगला टाकल्यावर होते.   साईड  पोस्टिंगच्या ऑफिसमध्ये  दिवसभर कुत्रसुद्धा फिरकत नव्हत आणि इथं आता दिवसभर श्वास घ्यायलासुद्धा वेळ नाही.! साईड पोस्टिंगच्या  ऑफिसमध्ये  नुसती शांतता , positive vibes etc… आणि इथं एवढा गदारोळ, गोंधळ की भूतं सुद्धा settle होताना चार वेळा विचार करत असतील अशी परिस्थिती!!  दिवसभर इतकं busy शेड्यूल की प्लॅनींग करायची भीती वाटते. प्रत्येक क्षणी कुठ येऊन पडलो ही भावना!!त्यामुळे शासनाने प्रथम या side posting identify  करुन notify केल्या पाहिजे. अशा पदावर काम करण्याची( अर्थात कामच न करण्याची!!) इच्छा असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून  अगदी सेवेमध्ये जॉइन होतानाच  preferance भरून घेतले पाहिजे - side posting की field आणि त्यानुसार त्यांना training द्यायला पाहिजे…नाहीतर नेपाळसोबत  लढण्यासाठी कशाला  राफेल विमाने तयार करायची? म्हणजे आपल्याला फिल्डवर काम करण्यासाठी  किती उच्च दर्जाचं training मिळत याचा  अंदाज  यावरून येतो, मात्र हे वाचून आपल्याला ट्रेनिंग देणाऱ्या  संस्थांचं (जाऊद्या  आता नाव नाही लिहीत..नाहीतर तिथले साईड पोस्टिंगवाले मारायला येतील!) उर भरुन आलं असेल…तथापि त्याना पुनश्च जमिनीवर लँड व्हायचे असल्यास सुलभ संदर्भासाठी याच साहेब सीरीजमधील ‘प्रशिक्षण’ या लेखाचे अध्ययन करावे…
©गोविंद खामकर
(टीप:  'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व लेख   https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)












Monday, May 8, 2023

प्रशासनातील निर्णयप्रक्रिया

हल्लीच्या काळात decision making वर नेहमीच चर्चा होताना दिसते. सामान्य जनतेला सुद्धा शासन, प्रशासन यांच्याकडून वेगाने निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा असते. पण असं चित्र शासनात  पहायला मिळते असे अजिबात नाही.
विशेष म्हणजे या प्रशासनातील साहेब मंडळींची भरती MPSC, UPSC सारख्या परीक्षा देऊन होते. MPSC, UPSC सारख्या परीक्षांमध्ये सर्वच टप्प्यांवर उमेदवारांच्या निर्णय क्षमतेचा कस लागतो.
परंतु  ही साहेब मंडळी एकदा प्रशासनात रुजू झाली रे झाली की  एकदम safety mode वर shift होतात!!. जणू त्यांना रुजू होण्यापूर्वी त्यांच्या  नजरेतील आदर्श साहेबाने काहीही पूर्ण वाचल्याशिवाय सही करायची नाही या तत्वाच बाळकडू तोंड दाबू दाबू  पाजलय.. त्यामुळे ते हे तत्व  सहजासहजी विसरत नाहीत. परंतु  सुरुवातीच्या काळात logical  असलेले साहेब काही काळानंतर जरा practical होतात  आणि नंतर  पक्के कोंबडेबहहद्दर होतात!!...हे स्थित्यंतर एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेसारख चालू असते..
खरं तर  साहेबाने  तरी output वर focus ठेऊन काम करायला पाहिजे पण  बरेच साहेब स्वतःला शासनाळलेल्या  process मधेच स्वतःला गुंतूवून घेतात. उदा. कर्मचारी दिवसभर काय करतो हे न पाहता केवळ कर्मचारी वेळेवर कार्यालयात  आले पाहिजे यावर भर देणारे साहेब !!   त्यातच प्रशासनात एवढी बिनकामाची कामे, processes follow  कराव्या लागतात की नुसत्या   process follow केल्या  तरी कर्मचाऱ्यांना  खूप काम केल्याचा आनंद मिळतो!! याच आदर्श उदाहरण म्हणजे काही शासकीय   कार्यालयात चार पाच कर्मचारी कार्यरत असतात आणि त्यातील एक कर्मचारी महिनाभर या चार पाच कर्मचाऱ्यांचे  पगारबील काढायला सोडलेला असतो!!   त्यामुळे कामातून काय साध्य झालं याचं काहीच देणेघेणे कोणाला असल्याचे दिसत नाही परंतु हे भान किमान त्या ऑफिसमधील साहेबाला तरी असणे आवश्यक आहे. परंतु तिथला साहेबही जेंव्हा यामध्येच गुंतून जातो त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या कार्यालयात शासकीय कार्यालयाचा feel येतो.
      समाजामध्ये या साहेबांकडे जरी फार कार्यकुशल व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते मात्र वस्तुस्थिती अशी आहे की निर्णय एक तर सर्वात वरचा साहेब  घेतो किंवा  सर्वात खालचा कर्मचारी घेतो , मधले  सगळे पोस्टमन असतात. त्यामुळे पोस्टमन फक्त टपालखात्यात असतात हा गैरसमज प्रथमतः डोक्यातून काढला पाहिजे. यामधून पोस्टमनला काहीच काम नसतंय असा निष्कर्ष काढू नये,उलट आपल्यातील बरेच लोक पोस्टमनसारख्या मानाच्या पदावर प्रतिनियुक्तीने जाण्यास पात्र आहेत असा सकारात्मक अर्थ काढण्यास हरकत नाही. 
मधल्या साहेबांची अवस्था एकतर पोस्टमन सारखी असते नाहीतर call center मधल्या साहेबासारखी!! असेही प्रशासनातील  90% निर्णय clerk घेतात ही वस्तुस्थिती प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या निदर्शनास आली असल्याने   Indian Clerical Service एवढी एकच सेवा  फक्त ठेवून बाकीच IAS वगैरे सगळं बंद करून टाकायला हरकत नाही. 
             निर्णय न घेण्याच्या प्रक्रियेतील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे  वरिष्ठांना मार्गदर्शन मागविणे... वरचा साहेब फार तज्ञ असतो हा समाजातील गैरसमज खालच्या साहेबाच्या पण डोक्यात जातो आणि तो मार्गदर्शन मागवतो. योग्य कारणास्तव जरूर मार्गदर्शन मागविले पाहिजे मात्र  मार्ग स्पष्ट दिसत असतानासुद्धा  उठसुठ मार्गदर्शन मागणे चूक आहे. मार्गदर्शन मागवण्यामध्ये  timepass करणे हा साधारनपणे महत्वाचा उद्देश असतो, दुसरा उद्देश असा असतो की किचकट प्रकरण  वरच्या साहेबाच्या  माथी मारून त्याच्याकडून वदवून घेणे. काही वरिष्ठ  साहेबाना नुसत मार्गदर्शन माघीतल तरी तळपायाची आग मस्तकाला जाते, परिस्थितीही बऱ्याचदा तशीच असते...मात्र हे वरचे साहेब पण लै भारी! यांचं मार्गदर्शन म्हणजे  शासन निर्णयानुसार उचित  कार्यवाही करावी!!  याचा थोडक्यात अर्थ असा की तुम्हाला  जे करायचं ते करा(भावनांना आवर घालून जरा सात्विक शब्दप्रयोग केला आहे)  फक्त आम्हाला विचारु नका!!
याउलट वरच्या एखाद्या  साहेबाला तोंडी मार्गदर्शन विचारा, तासभर सोडणार नाहीत एवढं मार्गदर्शन करतील पण यांना पेन मात्र  उचलत नाही!!  याच एक साध उदाहरण द्यायच झालं तर निवडणूक आचारसंहिता.. यामध्ये अमुक अमुक एखादी कृती करावी किंवा नको यासंदर्भात खालचा कर्मचारी  काही विचारतो तेंव्हा वरचा साहेब सांगणार " मला तरी अस काही करायला अडचण येईल असं वाटत नाही" मग खालचा कर्मचारी म्हणतो साहेब तेवढं लेखी द्या म्हणजे आम्हाला पुढची कार्यवाही जाईल..मग वरचा साहेब गप होतो!!...हे असलं decision making कोणत्याच MBA च्या पुस्तकात सापडणार नाही!!
       एकंदरीत सगळीकडे फक्त निर्णय न घेण्याची स्पर्धा सुरू असताना दिसते. हे माझ्याशी कसं संबंधित नाही हे सांगण्याचा आटापिटा..साहेबाच्या स्वतःच्या ऑफिसमध्येही तीच परिस्थिती...कनिष्ठ कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने   टिपणीत निर्णय  लिहायला पाहिजे अशी साहेबाची अपेक्षा..त्याला  टिपणी दुरुस्त करायला सांगणार पण स्वतः लिहिणार नाहीत..  नुसते कोंबडे मारण्याच्या सवयीमुळे बरेच वरचे साहेब निर्णय स्वतः घ्यायचे  असतात हे सुद्धा विसरून गेलेले आहेत!!! 
बऱ्याचदा साहेब लोकांना Court मध्ये जाण्याचा सल्ला देताना दिसतो,  कित्येक वेळा ही प्रकरणे निव्वळ अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत असताना सुद्धा कोर्ट कचेऱ्या करून मग कोर्टाने सांगितल्यावर साहेब निर्णय घेतो. अगदी एखाद्या सारख्याच प्रकरणामध्ये कोर्टाने एखादा निर्णय दिला तरी देखील तशाच स्वरूपाच्या  प्रकरनावर निर्णय घ्यायला सुद्धा अधिकारी धजावत नाहीत.. हल्ली उठसुठ न्यायालयात जाण्याच्या वृत्तीला अधिकाऱ्यांची निर्णय न घेण्याची वृती जास्त जबाबदार आहे... नशीब अजून कोर्ट नियमानुसार कारवाई करा,उचित कार्यवाही  असलं गुळगुळीत मार्गदर्शन शक्यतो देत नाही.. 
आपल्य मुंबईच्या कार्यालयात तरी काय वेगळी परिस्थिती आहे? जे निर्णय घेतले जातात ते खरंच राज्यकर्त्यांनी घेतलेले असतात का?  मुळात ज्यांना निर्णय घ्यायचा अथवा ज्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे ते सक्षम नसल्याने अथवा त्यांच्याकडे अतिकाम असल्याने  किंवा त्यांना जे काम मिळालं आहे त्यापेक्षा त्यांना  इतर कामे महत्वाची वाटत असल्याने   त्यांच्या आजूबाजूचे, नजीकचे, उजवे हात ,डावे हात वगैरे हेच निर्णय घेतात...तशीच काहीशी परिस्थिती फिल्डवरील अधिकाऱ्यांच्या बाबतीत दिसून येते...फिल्डवरील अधिकाऱ्यांनी  घेतलेले निर्णय खरंच  हेच अधिकारी स्वतः घेतात की ते निर्णय जणू काही अधिकाऱ्यांनी घेतले आहेत असे भासवून दुसऱ्या कोणाचे( भाऊ, दादा वगैरे..) तरी निर्णय साहेबाच्या लेखणीतून वदवून घेतले जातात हा विद्यमान सरकारी व्यवस्थेतील संशोधनाचा विषय आहे..
अधिकारी निर्णय घ्यायला का धजावत नाहीत याला कारणीभूत असलेल्या ठळक बाबी म्हणजे  ज्या बाबीवर निर्णय घ्यायचा आहे त्याबाबतीत नियमांमध्ये स्पष्टता नसणे,  चुकीचा निर्णय   झाला तर  त्याची जबाबदारी साहेबावर  निश्चित होऊ शकते(आपण जबाबदार आहोत म्हणूच आपण साहेब आहोत..असो), किंवा दोन तुल्यबळ गटांचे  interest असल्याने साहेबाचा  निर्णय घेताना sandwitch होतो, आपल्या निर्णयाने कोणीतरी नाराज होणार, हितसंबंध दुखावले जाणार  ही भीती... त्यामुळे बरेच साहेब  असल्या परिस्थितीमध्ये निर्णयच न घेता तसेच भिजत घोंगडे ठेवण्याचे  तत्व स्वीकारताना दिसतात आणि  ते  बहुतांशी स्थितीत रामबाण उपायासारखे लागूही पडताना दिसते कारण  निर्णय न घेतल्याने पगार कमी होत नाही आणि  घेतलेले निर्णय तपासायला 2-4 प्रकारचे ऑडिट!!!
          वास्तविक इथे  लोकशाही असली तरी  जो जास्त जोरात बोंबलतो त्याच्या बाजूनी  प्रशासन निर्णय देताना दिसते ही वस्तुस्थिती आहे कारण नियमाचे, शासन निर्णयांचे  Interpretation कोण कसं करत यावरती निर्णय अवलंबून असतात..आणि शासन निर्णयातील भाषा अशी असते की प्रत्येकाला आपल्या सोयीचा अर्थ काढण्याची मुभा असते. खरं   तर ज्या बाबींबद्दल शासन निर्णयात अथवा नियमात स्पष्ट तरतूद नाही त्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेणे हेच साहेबाचे मुख्य काम आहे आणि साहेबाला हीच गोष्ट सर्वात जास्त त्रासदायक वाटते...
 खरं तर प्रत्येक situation मध्ये कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेतले  तर नोकरी करणं महाकठीण आहे , त्याऐवजी सामोपचाराने परिस्थितीनुसार  मार्ग काढावा लागतो. नाहीतर त्या साहेबाचा  कामापेक्षा सतत बिऱ्हाड शिफ्टिंग मध्ये जास्त वेळ जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे 
सर्वात खालच्या घटकाने निर्णय घेतले तर त्याची अंमलबजावणी सुद्धा होते, result तात्काळ मिळतो...याउलट वरच्यांनी घेतलेले निर्णय वरच राहतात किंवा त्यांनी घेतलेले  निर्णय खाली येइपर्यन्त खालचे कायमचे  'वर' जातात.....
क्रमशः:
©गोविंद खामकर


Wednesday, April 19, 2023

साहेब आणि चहा

लेख 21 वा:   साहेब आणि चहा..
( 'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व 20 लेख    https://gamatijamati.blogspot.com   या लिंक वर उपलब्ध आहेत)

खरं तर चहा हे Original 'साहेबांच 
' भारतातील invention आहे...जरी ते तिकडल फॅड असलं तरी त्याच्या मध्ये प्रचंड varieties भारतीयांनी आणलेल्या आहेत...
गरम गरम चहा एखाद्याला पाजला तर त्याच डोकं थंड होत हा anti thermodyanamics rule यशदामध्ये तसेच बऱ्याच वरिष्ठ  साहेबांकडून नवशिक्या साहेबांना  शिकवला जातो. हल्ली समाजातील  या गरम डोक्यांची संख्या वाढल्याने साहेबाला law and order maintain करण्यास्तव लोकांना चहा पाजण्यासाठी वाढीव तरतूद करून दिली पाहिजे. त्यासोबतच सर्व चहाच्या दुकानदारांना शांतता दूत म्हणून प्रमाणपत्र दिलं पाहिजे. तसेच चहाला Low cost high yeild activity चा दर्जा देऊन यासाठी शासनाने साहेबाच्या ऑफिसला चहासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून दिली पाहिजे...
 कित्येक प्रकरण चहाच्या टपरीवर मिटतात, जुळतात, उद्भवतात सुद्धा !! .   खरं तर  चहा म्हणजे फक्त चहा नव्हेच, बहुतांशी वेळा ते एक फक्त निमित्त असत, याला साहेबाच ऑफिस मुळीच अपवाद नाही..
साहेबाने  एखाद्या अभ्यागताला  चहा विचारला नाही तरी त्याचा ego hurt होतो, स्वाभिमान दुखावला  होतो, त्याचा स्वाभिमान दुखावला जातो.. किमान विचारायला तरी पाहिजे होतं असं त्याचं मन त्याला खात असतं. काही तर एखाद्याने चहा न पाजल्याने आपली चहाच्या कपाएवढी सुद्धा इज्जत नाही असं स्वतःचे मापे काढत असतात. खरं तर अस ज्यांना वाटत त्यांनी स्वतःच मूल्यमापन योग्य केलेले असते पण हे त्याला सांगणार कोण? . चहाऐवजी coffee ला अजूनही जरा elite दर्जा आहेच त्यामुळे coffee offer केल्याने अभ्यागत स्वतःच्या मनात स्वतःचे स्थान अजून उंचीवर नेत असतो(विनाकारण!).
बरं आज काल diabetic लोकांची संख्या बरीच वाढल्याने चहाला नकार देणाऱ्यांची संख्या सुद्धा कमालीची वाढली आहे, त्यामुळे साहेब पण बिनधास्त चहा offer करत असतो. बरं " चहा घेणार का?", "नाही , आत्ताच घेतलाय" ," थोडा घ्या ना चालतो, black tea तरी?" ,"बरं ठीक आहे"...अशा प्रकारे नाही होय म्हणता म्हणता प्रकरणे  black tea वर मिटताना पहायला मिळतात.. त्यात पुन्हा गुळाचा चहा,  हळदीचा चहा, , तुळशीचा चहा,  बिनसाखरेचा चहा,  बिनपाण्याचा चहा,  बिनचहाचा चहा,  असले प्रकार वाढल्याने चहाला नकार मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे.
चहा कोणाला offer करायचा यासाठी कोणताच thumb rule साहेबांकडे नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज निर्माण होतात. बऱ्याचदा तर एखाद्या व्यक्तीसोबत साहेब चर्चा करतो, तेवढ्यात साहेबांकडे दुसरा व्यक्ती येतो.. मग साहेब त्याला चहा offer करतो, त्यामुळे पहिली व्यक्ती  चहापायी आपला  आत्मसन्मान गमावण्याची शक्यता निर्माण होते.त्यामुळे अशी प्रकरणे साहेबाने जपून हाताळली पाहिजे. 
बऱ्याच साहेबाच्या ऑफिसमधील सर्वात वाईट प्रकार म्हणजे चहा वेळेवर न येणे. म्हणजे ज्याच्यासाठी चहा सांगितला त्याच्याबरोबरची  महत्वाची चर्चा संपलेली असते फक्त चहा येत नाही म्हणून त्याला जाता येत नाही आणि साहेबाला पण त्याला जा म्हणता येत नाही.  त्यात तो सारखंच साहेबाला म्हणणार निघतो आता, साहेब म्हणणार नाही येईल चहा आता,थोडं थांबा..हे असं बराच वेळ सुरू असतंय. बरं या अटीतटीच्या काळात अतिशय बिनकामाच्या  विषयांकडे चर्चा फुटतात, काहीच संबंध नसतात मला एका अभ्यागताने या waiting time मध्ये रशिया युक्रेन युद्धावर चर्चा करण्यास भाग पाडले होते.. असो! एकदा चहा सांगितल्यानंतर तो येण्यास विलंब का होतो याचा जिज्ञासूवृत्तीने अभ्यास केल्यास काही महत्वाच्या बाबी निदर्शनास येतात. साहेबाने आपल्या ऑफिसच्या परिसरातील चहाच्या दुकानात प्रत्यक्ष जाऊन चहा पिल्याशिवाय  या प्रक्रियेतील parameters , त्यासंदर्भातील backward linkages , forward linkages लक्षात येणारं नाहीत. एक तर ज्याला चहा सांगितला आहे तो चहाचा निरोप तेवढ्या gravity ने सांगत नाही, चहावाल्याला मागच्या एखाद्या साहेबाच्या काळात त्याच्या पैशाबाबत वाईट अनुभव आल्याने तो साहेबाच्या order ला priority वर घेत नाही, दोन चहासाठी एवढ्या अंतरावर जाण्याचा कंटाळा तथा अव्यवहार्यता वगैरे... काही साहेब तर चहा लवकर आला नाही म्हणून सुद्धा त्यांचा आत्मसन्मान दुखावून घेतात, असल्या साहेबांनी आपल्या मानसिक स्वास्थ्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. बरं हे झालं regular process ने चहा बोलविण्याबाबत... मी बऱ्याचदा विचार करतो लेखसंहितेचे नियम पाळून अभ्यागताना  चहा पाजता येईल का.... चहावाला बिल देतो का? तो खरंच जेवढ्या वेळा चहा दिला तेवढे बिल देऊ शकतो का? 
चहासाठी annual supply contract करता येईल का? त्यासाठी चहावाल्यांकडे documents असतील का, त्यासाठी किमान तीन चहावाले तरी पात्र होतील का.. आणि असे बरेच काही प्रश्न आहेत. एकंदरीत सर्वच शासकीय अस्थापनांमध्ये चहाची देयके कशी अदा केली जातात याचा सर्व्हे मनोरंजक असेल...
मग काही तज्ञ साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्येच चहा तयार होईल अशी व्यवस्था निर्माण केली, कोणी चहाच्या मशीन लावल्या, पण नंतर बहुतेक ठिकाणी त्या बंद पडून पारंपारीक पद्धतीने चहा मागवण्याची पद्धत चालू झाली आहे. पण  साहेबाच्या ऑफिसमध्ये चहा खूपच लवकर आणि दर्जेदार मिळायला लागला तरी ते  सुदधा जोखिमेचच  आहे!! आपण समजदार आहात!!.. त्यामुळे याबाबतीतही साहेबाने काळजी घेणे आवश्यक आहे.
साहेबाच्या ऑफिसमध्ये चहासाठी जे कप वापरले जातात त्यावरून सुद्धा बरेच अंदाज लोक बांधत असतात पण त्यावर चर्चा करून विनाकारण नको ते निष्कर्ष इथे मांडणे उचित नाही!!(तथापि आपण यावर जरूर मंथन करावे).
 जेंव्हा वरच्या साहेबाच्या ऑफिसला जातो तिथे सुद्धा साहेबाला वरच्या साहेबाने चहा offer केला नाही तर साहेबाचा आत्मसन्मान दुखावण्याची शक्यता असते.जो वरिष्ठ साहेब गेल्यावर  चहा वगैरे offer करतो त्याची चांगली प्रतिमा साहेबाच्या मनात निर्माण होते. बऱ्याचदा आढावा सभेमध्ये वातावरण तापलेल असताना तो चहावाला आढावा घेणाऱ्या साहेबाचा tempo घालवत असतो.  एखाद्यावेळी तर  वरिष्ठ साहेब अतिशय गंभीर होऊन एखाद्या विषयाचा आढावा घेत असताना एखादा स्वच्छंदी साहेब  जेंव्हा सगळं भान  विसरून चहाचे मनमुराद झुरके ओढत असतो ,हे सगळं दृश्य पाहून वरिष्ठ साहेबाला नुसती मीटिंग नाही तर नोकरी सोडून द्यावी वाटते.. पण बोलायची सोय नसते!!!
चहा पिल्यामुळे माणसाला फ्रेश वाटत असा सामान्यतः समज आहे. कदाचित त्यामुळे कामकाजाची efficiency देखील वाढत असेल. पण चहापासून होणाऱ्या फायद्यांपेक्षा चहाच्या नावाखाली केला जाणार timepass ही राष्ट्रीय समस्या आहे.  नुसते चहाचे दर  जरी कमी असले तरी त्या चहासोबत  साधं पाणी जोडलं की त्याच ' चहापाणी' होतं आणी त्याचे दर मात्र गगनाला भिडतात!! पाण्यामध्ये अफाट सामर्थ्य आहे..असो!   ऑफिसमधील बिनकामाचा  माणूस चहा प्यायला गेला तर काही वाटत नाही पण कामाचा माणूस चहाला गेलेल साहेबाला अजिबात सहन होत नाही. शासनाने  शासन निर्णय काढून जशा जेवणाच्या वेळा ठरवल्या आहेत तशा चहाच्या ठरवलेल्या नाहीत. त्यामुळे चहासाठी कार्यालय सोडणे ने नियमाच्या चौकटीत बसत का याचा पण शोध घ्यायला पाहिजे.
असो!!
 काहीही असलं तरी चहाचं  सध्याच्या  संस्कृतीतील स्थान अजून तरी मजबूत आहे..Enjoy your  Tea!!

क्रमशः
©गोविंद खामकर
(टीप:  'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व लेख   https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)












Friday, November 18, 2022

प्रशासन आणि संघटना

लेख 20 वा : प्रशासन  आणि संघटना

शासनामध्ये संघटनांचे प्रचंड पेव फुटलेले आहे. असा कोणताच संवर्ग  नाही ज्यामध्ये  संघटनेचा शिरकाव झाला नाही.  अगदी पोलिसांना संघटना करता येत  नाही तर त्यांच्या पत्नींची संघटना निर्माण झाल्याचे ऐकिवात आहे.  मुळात संघटनेमध्ये सहभागी  होण्यासाठी काही गृहीतके मनाशी पक्की असणे आवश्यक आहे  अन्यथा आपली सतसतविवेकबुद्धी  जागरूक ठेवून संघटनेमध्ये सामील होणं ही थोडीशी  अवघड बाब आहे...
यातील सर्वात महत्वाचं गृहीतक म्हणजे आमच्या संवर्गावर  शासनाकडून प्रचंड अन्याय होत आहे ही धारणा पक्की असणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही शासनावर प्रचंड उपकार करतो, आमच्याशिवाय शासनाच पानही हालत नाही हा स्वतःशी  गैरसमज पक्का असणं सुद्धा फार गरजेचं  आहे!! शिवाय  लॉजिक   आणि मागण्या यांचा शक्यतो  फार जवळचा संबंध असू नये म्हणजे शासनाकडे एवढं मागितलं पाहिजे की त्यातलं दहा टक्के मान्य झालं तर समाधान वाटलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे मागण्या कधीच संपता कामा नये!! शासनाने देत जावे, संघटनेने मागत जावे, मागतच जावे!!  मुळात संघटना धारदार बनवायची असेल तर संघटनेकडे  सामंजस्यपणा थोडा कमीच असणे फायदेशीर ठरते, किंबहुना सामंजस्यपणा  असला तरी दाखवू नये!!
एकंदरीत प्रशासनातील  संघटनांची संरचना पाहता ती संघटना कोणत्या संवर्गाची आहे यावरून तिचा पॅटर्न  ठरतो. जर ती संघटना सर्वात कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल तर ती खूप organised असते. त्यांच्यामध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्य या पातळीवरचे विविध प्रकारचे  पदाधिकारी,  विधीमंडळाच्या वर यांची अधिवेशने, त्यातील मुद्दे, प्रश्न आणि बरेच काही. शिवाय त्यातील पदाधिकार्यांचा रुबाब पाहून त्यांचे मोठे साहेब सुद्धा अवाक होतात!  बऱ्याचदा  तर या कर्मचाऱ्यांच्या एकाच संवर्गामध्ये दोन चार संघटना असतात!! याचं   कारण अस सांगितलं जातं की त्यांच्यामधील कार्यप्रणाली ,तत्वे, मागण्या  यामध्ये  असलेले मुलुभूत फरक!!   म्हणजे अगदी स्वातंत्रपूर्व काळातील  जहाल गट, मवाळ गट याप्रमाणे !! सांगायची कारणे काहीही असली तरी त्या संवर्गामध्ये असलेली प्रचंड सदस्य संख्या आणि नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेली  गर्दी  यामुळे एकाच संवर्गातील  संघटनांची संख्या बिनकामाची वाढत असते.  यांच्या  संघटनामधील  बरेच कर्मचार्यांनी तर स्वतःला संघटनेसाठी वाहून घेतलेलं असते. यांच्या डोक्यात संघटना सोडून काहीच दिसत  नाही.  स्वतःचे काम सांभाळून संघटनेला वेळ देणारे सुद्धा  असतात , पण काहीजण मूळ काम अजिबातच करत नाही !!!  या संघटनांतील कर्मचाऱ्यांना ते राबवत असलेल्या चार शासकीय योजनांची कमी माहिती असेल पण संघटनांच्या मागण्यांबाबत ते प्रचंड जागरूक असतात. मुळात या कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे नेते सुद्धा चांगले राजकारणी होण्याच्या पात्रतेचे असतात मात्र  संधी न मिळाल्याने चुकून शासकीय नोकरीत आलेले असतात असे माझे मत आहे. 
याच्या अगदी  उलट म्हणजे साहेबांच्या संघटना!! कोणाचाच कोणाला मेळ नाही!! बाकीचे पदाधिकारी तर सोडाच पण त्यांच्या  संघटनेचा अध्यक्ष निम्म्या साहेबाना माहिती नसतो. एकच संघटना असून सुद्धा एवढी बोंब असल्याने यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त संघटना असण्याचा धोका उद्भवत नाही. यांच्या  संघटनेला एखादं निवेदन द्यायचं असेल तर बोटावर मोजण्याइतपात टाळके गोळा होत नाहीत आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे निवेदन द्यायला पार चेंगराचेंगरी!!! 
आंदोलन आणि संघटना यातील नातं अतूट आहे. आंदोलन केल्याशिवाय संघटनेला शासनदरबारी कोणी भाव देत नाही हा सार्वत्रिक समज आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आंदोलने तर डोळे दिपवणारी असतात!! या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती  असते! भाषणे, घोषणा,आक्रोश यांनी परिसर दुमदुमून जातो. इथं मात्र ते वरिष्ठ वगैरे कोणाचीच भीड बाळगत नाही! एखाद्या त्रयस्थ कष्टकरी  व्यक्तीने जर ही आंदोलने पहिली तर त्याला सुद्धा वाटेल की एवढे अगणित अन्याय सहन करून हे  बिचारे नोकरी करत आहेत, यांच्या मागण्यांसमोर माझं दुःख काहीच नाही, यांचं आधी मिटवा!!!
याउलट साहेबांची आंदोलने म्हणजे अगदीच  मुळमुळीत!! सुरुवातीला मोठ्या थाटात काम बंद करण्याचे निवेदन द्यायचे , नंतर शासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर(साहजिकच चर्चेसाठी हेच शासनाकडे स्वतःहून जाणार!) आणि आश्वासनानंतर  त्यामध्ये अंशतः बदल करून काळ्या फिती लावून आंदोलन, निषेध नोंदविणे इत्यादी थातुरमातुर प्रकार.. ते पण फारतर एखादा दिवस वगैरे!!  ही आंदोलने संपले तरी बऱ्याच साहेबांना अस कुठलं आंदोलन होत याची कल्पनाही नसते. अशी  आंदोलने  सुद्धा साहेबांची आंदोलने म्हणजे जरा sophisticated वाटली पाहिजे याची दक्षता घेतली जाते...
बऱ्याचदा एखादी शासकीय योजना राबवताना शासनाकडून साहेबांवर प्रचंड pressure असतो आणि खालच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असते. वाईट प्रकार म्हणजे साहेबाला वरिष्ठांना ही सांगायची सोय सुद्धा नसते की खालच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. बरं साहेबाने जरी हे  कारण सांगितलं तरी वरचा साहेब त्याला हे प्रकरण तुमच्याच पातळीवर मिटविण्याचा सल्ला देऊन मोकळा होतो!!खालच्या साहेबाला जर संघटनेसोबत व्यवस्थित मेळ ठेवता आला नाही तर त्याचे वरिष्ठ  साहेब संघटनेला कधीच दोष देत नाहीत!!!, उलट साहेबालाच ते हँडल अथवा मॅनेज करणे जमले नाही असे म्हणून साहेबावर खापर फोडून मोकळे होतात. एखादा साहेब यांच्या  संघटनेसोबत डोकं लावायला लागलाच तर हे कर्मचारी बिनधास्त सांगतात हे आमचं आंदोलन वरच्या लेव्हल वरून सुरू आहे, तुम्ही त्यात पडू नका!  ! नंतर शासन या संघटनांशी स्वतःहून चर्चा करणार, मनधरणी करणार, एखादं आश्वासन देणार तेंव्हा कुठं यांचं आंदोलन मागे घेतलं जातं!! या  कर्मचार्यांच्या संघटनांनी फारच लावून धरलं तर मोठ्या मोठ्या साहेबांच्या शासन बदल्या करून टाकत!   कधी कधी साहेब या कर्मचाऱ्यांच्या संघटनांना पार वैतागून जातो! म्हणजे  साहेबाला कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा त्रास वाटतो आणि आपली संघटना मजबूत असायला पाहिजे असंही  वाटतं हा दुटप्पीपणा आहे !!! 
जेंव्हा एखाद मोठं पाहणी पथक, समिती अथवा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ येते तेंव्हा हेच साहेब ज्यांना संघटना अडचणीची वाटते त्यांना संघटना आधार वाटते!! थोडक्यात असं की  खालच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या सहजासहजी कोणी नादाला जात नाही, शासनसुद्धा नाही!!
  या संघटनांच्या बाबतीत बरेच गैरसमज देखील रुढ असतात. त्यापैकी एक म्हणजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळत असतात! खरंच हे असं घडतं का हा संशोधनाचा विषय आहे! दुसरा गैरसमज  म्हणजे संघटनेकडे भरपूर पैसा असतो, जणू काही संघटनेला foreign वरून फंडींग मिळत! पण हे दुःख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाच माहिती असतं. यातील सर्वात मजेशीर बाब अशी की एवढा गलेगट्ट पगार असणारे साहेब संघटनेच्या वर्गणीचा विषय निघाला की काढता पाय घेतात आणि तुलनेने तुटपुंजा पगार असणारे कनिष्ठ कर्मचारी संघटनेची वर्गणी नियमित जमा करतात!! अजून एक गैरसमज असा की आपल्या संघटनेपेक्षा इतर संवर्गाच्या संघटना खूप भारी आहेत!!. हे म्हणजे आपली बायको सोडून शेजाऱ्याच्या बायकोच कौतुक केल्यासारखा प्रकार आहे पण ज्याचं त्याच दुःख ज्याला त्याला माहिती!!!
   संघटनेमध्ये सदस्य असणाऱ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या मानसिकता असतात. यातील बहुसंख्य वर्ग हा संघटनेवर सदैव टीका करणारा असतो. तसं यांचं संघटनेला विशेष योगदान तर काहीच नसतंय पण कोणतीही चळवळ न करता  नुसती वळवळ!!. याउलट काहींना संघनेकडून प्रचंड अपेक्षा! आपले वैयक्तिक कुटाने ,भानगडी सुद्धा संघटनेने  सोडवल्या पाहिजे अशी भोळी भाबडी आशा ठेऊन जगणारे सुद्धा बरेच अधिकारी, कर्मचारी आहेत. अगदी शेजाऱ्यासोबत झालेली भांडणे सुद्धा संघटनेने मिटवली पाहिजे इथपर्यंत!!  अजून एक प्रकार म्हणजे स्वयंभू साहेब!! संघटनेवर विश्वास म्हणजे अंधश्रद्धा असा समज असणारे! हे साहेब कुठेही व्यक्त होत नाहीत, मत मांडत नाहीत. असले साहेब  त्यांच्या भानगडी त्यांच्याच पातळीवर मिटवायची खात्री बाळगतात! असले साहेब शक्यतो जिथे मेवा तिथेच सेवा या तत्वावर काम करणारे असतात.   अजून एक नव्याने उदयास आलेला प्रकार म्हणजे फक्त whatsapp वर ऍक्टिव्ह साहेब!  यांच्यामुळेच संघटना जिवंत आहे असल्याचा फील येतो.  हे साहेब रिकाम्या वेळात काहीतरी पिल्लू काढून सगळ्यांना त्या विषयावर मत मांडण्यास प्रवृत्त करतात. मग त्यातून एखाद्या नव्या मागणीचा जन्म होतो आणि मग पुन्हा निवेदन!!
खरं  तर संघटना हे insecurity चे अपत्य समजले जाते, मात्र शासकीय नोकरी असलेला सर्वात secured घटक   जेंव्हा स्वतःला insecure समजून  संघटनेमध्ये सहभागी होतो ही बाबच फार मजेशीर आहे. हे संघटनांचे प्रस्थ  एका मर्यादेत ठेवणं आवश्यक आहे आणि शासनाने सुद्धा या संघटनांच्या किती आहारी जायचं ते ठरवलं पाहिजे अन्यथा फिल्डवर   काम करणं प्रचंड जिकिरीचे होईल.   नाहीतर एक दिवस या  सगळ्यांना वैतागून  सामान्य जनताच आंदोलन  करून ही संघटनेची स्कीम कायमची बंद करून टाकील ...

©गोविंद खामकर



Saturday, August 20, 2022

लेख 19 वा: ऑडिट

ऑडिट ही प्रत्येक साहेबाच्या पाचवीला पुजलेली गोष्ट आहे. साहेब  वर्षभर जे काही(कुटाने!)  करतो त्याचा लेखाजोखा ऑडिटच्या माध्यमातून घेतला जातो.  Principles of financial propriety हा परवलीचा शब्द जवळपास सगळ्याच साहेबांना त्यांच्या  परिविक्षाधीन कालावधीत कानावर पडतो, त्यातलं पाहिलं तत्व अस की शासकीय  पैसा हा अशा पद्धतीने खर्च केला पाहिजे जणू काही तो आपल्या स्वतःच्या खिशातील पैसा आहे.. पण काही  साहेब याचा  मतितार्थ लक्षात  न घेता  शब्दशः अर्थ घेतात आणि  अगदी स्वतःच्या खिशातील पैशाप्रमाणे शासनाचे पैसे खर्च करून टाकतात!! !!!  मग ऑडिटरला 'शक' येणारच ना? ऑडिटमध्ये  निघणाऱ्या आक्षेपांना  'शक' म्हणण्याची प्रथा हिंदी भाषेतून असावी असा माझा समज आहे, तो गैरसमजही असू शकतो!
एकदा ऑडिटची टिम कार्यालयात आली की मग थोड्याशा प्राथमिक चर्चेचा सोपस्कार!! त्यात एखादा ऑडिटर 'जे काम करतात त्यांच्याच चुका होतात' असला  नेहमीचाच  डायलॉग मारून मोकळा होतो!! आता याचा अर्थ  नेमका काय काढायचा? ..काम करायचं सोडायचं की चुका करायचं सोडायचं  की दोन्ही .??
  मग ऑडिट सुरू होत.. रेकॉर्ड ची शोधाशोध, कागदांची जुळवाजुळव , जे कागदच अस्तित्वात नाहीत ते तयार करणे, काही कागद आहेत पण साहेबाचे कोंबडे हानायचे राहिले आहेत तिथे साहेबांचे कोंबडे पटापट मारून घेणे वगैरे असले उद्योग सुरू होतात. साहेब पण अशावेळी जास्त डोकं न लावता( नेहमीप्रमाणे!) कर्मचाऱ्याने आणलेल्या कागदावर कोंबडा हाणत असतो. या काळात  कर्मचारी असं काय काय साहेबाच्या सहिसाठी घेऊन येतात की साहेबाला प्रश्न पडतो आपल्याला एवढ्या दिवस यांनी हे का दाखवलं नाही.. पण आता साहेबसुद्धा  खिंडीत अडकलेला असतो त्यामुळे तो कोंबडे हाणून टाकतो. काही काही कर्मचार्यांनी काहीच रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नसल्याने ते ऑडिटरसोबत लपाछपीचा खेळ सुरू करतात!! 
    ऑडिट टीम च्या  गरजेनुरूप  त्यांच्या राहण्याची आणि इतर 'अनुषंगिक' बाबींची व्यवस्था हा देखील प्रथेचा भाग आहे. याकामी साहेबाच्या ऑफिसचे एक दोन कर्मचारी तैनात केलेले असतात. हे तैनात केलेले कर्मचारी शक्यतो एवढ्याच कामात तरबेज असतात त्यामुळे ही जबाबदारी वेळोवेळी त्यांच्याकडेच येते.
मग एक दोन दिवसात या टीमच आणि साहेबाच्या ऑफिसच 'सूत' जमलं की मग जास्त अडचण येत नाही. मग एकमेकांमध्ये 'सहकार्या'ची भावना वृद्धिंगत होऊ लागते. 'सहकार्याशिवाय' यशस्वी ऑडिट जवळजवळ  अशक्य आहे..खरं तर 'सहकार्य' हा एवढा 'बहुआयामी' शब्द असेल आणि त्याला इतके कंगोरे असतील याचा प्रत्यय प्रशासनात आल्यावरच येतो. म्हणजे अमुक अमुक ऑडिटरच आम्हाला नेहमीच खूप सहकार्य असत यातून काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "हे ऑडिटर अथवा साहेब खूप चांगले आहेत"  हे वाक्यच मुळी फार अद्भुत आहे!!  एक मात्र नक्की की या वाक्यातून साहेबाचा खरा स्वभाव नक्कीच कळत नाही.  ' चांगला साहेब' या विशेषणातून मला आतापर्यंतच्या शासकीय सेवेतून समजलेला अर्थ असा आहे की  साहेब मध्यम मार्गाने चालणारा माणूस!  हे 'चांगले' साहेब शक्यतो कोणालाच नाराज करत नाही.!! बऱ्यापैकी customized!!  जर आपल्याविषयी  एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला बोलताना आपले सहकारी अथवा कर्मचारी जेंव्हा आपला उल्लेख  'चांगला साहेब'  असा करतात तेंव्हा आपण जास्त हुरळून न जाता आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करण्यास आणि आत्मपरीक्षण करण्यास  प्रचंड वाव आहे असा साधा, सोपा, सरळ अर्थ  घेण्यास हरकत नाही.  म्हणजे एक चांगला साहेब आणि एक चांगला ऑडिटर ही जोडगोळी एकत्र आली तर काहीही करू शकते!!(इथे सकारात्मक अर्थ घ्यायला हरकत नाही)
...पण देशाचं खरं वाटोळं या एकमेकांबद्दलच्या सहकार्याच्या भावनेनेच होते  पण बोलायची सोय आहे का?  म्हणजे  'एकमेका साहाय्य करू, करूया वाटोळं सकळ जणांचे'...या उक्तीप्रमाणेच हा सहकार्याचा कार्यक्रम चालू असतो...आणि मग काय ..तेच तेच आवडते परिच्छेद...सालाबादप्रमाणे ..ज्याचं रेकॉर्ड सापडत नाही किंवा समाधानकारक नाही त्याचा आक्षेप न घेणे, जे रेकॉर्ड सापडतय त्यालाच 'रेकॉर्ड' आढळून आले नाही असा आक्षेप लावणे.. एक दोन आक्षेप वगळता सगळं कॉपी पेस्ट!!! 
हाफ मार्जिन, लेखी सूचना वगैरे हे असले सोपस्कार फक्त यशदापुरतेच मर्यादित असतात. म्हणजे आक्षेप  घेताना सुद्धा  एकमेकांचं कमालीचं   understanding असल्याने साधारणपणे जे परिच्छेद सहज वगळता येतील असेच घेतलेले असतात त्यामुळे memo reading वगैरे बहुदा  औपचारिकता म्हणूण पार पाडल्या जातात..
 बरं एवढंच सहकार्याची भावना असेल तर एकही आक्षेप घेतला नाही तर चालणार नाही का? पण यामुळे ऑडिटरच्या च्या वरचा साहेब नाराज होऊ शकतो... आपल्या खालची टीम 'कार्यक्षम' नाही असा 'चुकीचा' मेसेज  वरच्या साहेबाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या रामाच्या देशात एवढ्या पारदर्शक कारभाराच 'रामराज्य' अस्तित्वात असेल यावर ऑडिटरच्या वरचा साहेब विश्वास तरी कसा ठेवणार? बरं असेल  एखादं रामराज्य तर त्यात वरच्या साहेबाला काय 'राम' आहे?  . त्यामुळे  एवढे एवढे आक्षेप आलेच पाहिजे  असा अलिखित नियमच असतो..
'चांगल्या' साहेबाला ऑडिट मध्ये विशेष अडचण येत नाही(कारणे आपणच शोधा!!).  तसेच 
बिनधास्त बॅटिंग करणाऱ्या साहेबांमध्ये 'सहकार्याची' भावना जास्त असल्याने त्यांनाही  शक्यतो  ऑडिटमध्ये जास्त अडचण येतंच नाही..  मात्र   ऑडिटमध्ये  सगळ्यात जास्त अडचणी 'तत्वनिष्ठ' साहेबाला येतात हा प्रशासनातील(वाईट)  नियम आहे. तत्वनिष्ठ साहेबाकडून 'सहकार्याची' अपेक्षा नसल्याने त्याला  विनाकारण सहकार्य कसे प्राप्त होईल?  एक तर  तत्वनिष्ठ साहेबाला सहजासहजी 'चांगल्या' साहेबाचा दर्जा मिळत नाही(चांगले साहेब 'तत्त्वनिष्ठ ' नसतात असा निष्कर्ष काढण्याची आवश्यकता  नाही).  तत्वनिष्ठ साहेबाच्या  जास्त  बातम्या  देखील वृत्तपत्रात येत नाहीत( ज्यांच्या बातम्या सारख्या वृत्तपत्रात येत असतात ते तत्वनिष्ठ नसतात असला आगाऊ अर्थ आपण काढणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे!) खरं तर तत्वनिष्ठ साहेब हा  विद्यमान व्यवस्थेमध्ये  एक प्रशासकीय , राजकीय आणि काही  प्रमाणात सामाजिक अडचण ठरतोय का यावर विचारमंथन व्हायला पाहिजे, नाहीतर ही दुर्मिळ जमात नष्ट होऊ शकते!!(ही जमात दुर्मिळ आहे किंवा कसे याची आकडेवारी उपलब्ध नाही!)..
एकदाच ऑडिट होऊन जात!! ऑडिट नोट प्राप्त होते..बऱ्यापैकी आक्षेप  'ठरल्याप्रमाणे' असतात, काही आक्षेप जस 'ठरलं' होत त्यापेक्षा वेगळेच असतात, एकंदरीत संमिश्र चित्र!! ही ऑडिट नोट वर उल्लेखलेल्या 'दमदार' प्रक्रियेने तयार झालेली असते तरीसुद्धा  तिला कायद्यात विशेष महत्व आहे. पोलीस विभाग असो की  कोर्ट, या ऑडिट रिपोर्ट  वर प्रचंड प्रेम!! काही झालं की आधी ऑडिट रिपोर्ट विचारणारच! (अपराधसिद्धीसाठी ते आवश्यकही असेल). कधी कधी तर अपचारी सुद्धा त्याच्या बचावाच्या प्रतिवेदनात लिहितो की माझ्यावर जे घोटाळ्याचे आरोप लावले आहेत त्याचे यापूर्वीच ऑडिट झाले आहे आणि त्यामध्ये कोणताही आक्षेप निघालेला नव्हता!! मात्र अशा वेळी ऑडिटर ने हा आक्षेप का घेतला नव्हता हे विचारण्याची प्रथा आढळून येत नाही.
        ऑडिट नोट आली तरी तिच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. एक  तर त्या आक्षेपांच अनुपालन लवकर करावं असं कुणालाच वाटत नाही. यातील सर्वोच्च विनोद असा की 1970-80 च्या दशकातील आक्षेपांचे अनुपालन सुद्धा अद्याप प्रलंबित आहे. हे जुने आक्षेप म्हणजे नुसता वैताग!! बरं ज्यांच्या काळातील हे आक्षेप आहेत त्यातले किती हयात आहेत? फौजदारी गुन्हे सुद्धा एखादा गुन्हेगार मयत झाल्यावर निकाली निघतात मात्र ऑडिट आक्षेपांच्या बाबतीत ही सुद्धा सोय नाही.गेल्या  40- 50 वर्षात जेवढे  साहेब होऊन गेले त्यांनी याच अनुपालन केलं नाही किंवा अनुपालन दिले पण स्वीकारले नाही त्या अधिकाऱ्यांच  काय झालं , त्यांच्यावर कारवाई झाली का,  मग आपल्यावर तरी कशी होईल..यातूनच प्रेरणा घेऊन हे आक्षेप निकाली काढण्याचं कोणी मनावर घेत नाही.. एक तर 1970 च्या दशकातील आक्षेपांचे चे अनुपालन आत्ताचा कार्यरत साहेब करतो, अद्भुत आहे हे सगळं.!!..माझा काय संबंध हे म्हणायची तर अजिबात सोय नाही.!!  बरं एकदा बदली झाली की सुटले!! नवीन ठिकाणी नवीन आक्षेप  तयार करण्यासाठी मोकळे!! जोपर्यंत ज्या अधिकाऱ्याचा  काळातील आक्षेप आहेत  त्याच अधिकाऱ्याने निकाली काढण्याच दायित्व त्या अधिकाऱ्यावर पडणार नाही तोपर्यन्त या आक्षेपांच्या विळख्यातून प्रशासन मुक्त होणार नाही. 
     बरं या अनुपालनाची वेगळीच गंमत आहे. जे आक्षेप बऱ्याच वर्षापूर्वीपासून प्रलंबित आहेत बऱ्याचदा त्यांचे फक्त आकडेच सापडतात, ऑडिट नोटचा शोध लागत नाही आणि अनुपालन पाहिजे!!खुद्द ऑडिटर च्या कार्यालयात सुद्धा या जुन्या ऑडिट नोट सापडत नाहीत!!  एक तर या प्रलंबित आक्षेपांचे अनुपालन करण्यात फार कोणाला रस नसतो. एखादा हौशी साहेब येतो ज्याला वाटत माझ्या कार्यालयात काहीच pending नको... सगळं ok मध्ये  पाहिजे!! मग तो या  आक्षेपांच्या मागे लागतो. या साहेबाच्या कार्यालयातील मंडळी सुद्धा या 'बिनकामाच्या' कामामुळे वैतागून जातात. मग रेकॉर्ड ची शोधाशोध. नुसतं अनुपालन केलं ,दोन चार कागद जोडले म्हणजे प्रश्न सुटतो का? इथे सुद्धा 'सहकार्याची' भावना पाहिजेच!! नाहीतर काही अनुपालन करा, निष्फळ!! 'सहकार्याची'  भावना असेल तर मात्र कसल्याही चॉकलेट अनुपालनांनी आक्षेप वगळला जातो! उदा. यापुढे असे होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल किंवा अमुक अमुक करण्याची  कार्यवाही सुरू आहे किंवा आता रेकॉर्ड  उपलब्ध झाले आहे. अशा वेळी आतापर्यंत रेकॉर्ड सापडत नव्हते आता अचानक कुत्र्यांच्या छत्र्यासारखे कुठून प्रकट झाले  किंवा कार्यवाही सुरू आहे मग संपणार कधी किंवा यापुढे दक्षता घेण्यात येईल मग आतापर्यंत काय...... असो , असे अल्पप्रज्ञाधिष्टीत आणि कॉमन सेन्सला आवाहन देणारे  प्रतिप्रश्न विचारण्याची प्रथा अस्तित्वात नाही. कधी कधी तर अनुपालनासोबत जोडण्यात येणारे  पुरावे मानीव पद्धतीने जोडले जातात ,म्हणजे ऑडिटर ते पुरावे जोडले नसले तरी जणू काही जोडलेच आहेत असे गृहीत धरून  अनुपालन मंजूर करतो!!
   कधी कधी ऑडिटर आणि साहेब दोघांचीही आक्षेप काढण्याची निकड प्रचंड वाढते, यातून 'कॅम्प' प्रणालीचा जन्म होतो..कॅम्प हे दोघांच्या गरजेच प्रतीक असते.  इथे quality पेक्षा quantity ला जास्त महत्व असते, इथे सगळं ' wholesale ' मध्ये असते. या प्रणालीमध्ये सुद्धा बरेच आक्षेप निकाली निघतात....
अशा प्रकारे हा ऑडिट चा कार्यक्रम सालाबादप्रमाणे चालू असतो , राहील आणि ऑडिट मध्ये जे आक्षेप येतात(आणि येतच राहतील!) ते पुन्हा येणार नाहीत याबाबत यापुढेही 'सदैव दक्षता घेण्यात येईल' आणि ही कार्यवाही 'अविरत' चालू राहील....क्रमशः

©गोविंद खामकर

   











Saturday, July 9, 2022

साहेबाच प्रमोशन

लेख 18 वा : साहेबाच प्रोमोशन..
(यापूर्वीचे सर्व 17 लेख या   https://gamatijamati.blogspot.com   या लिंक वर उपलब्ध आहेत)

आधीच शासनातील पदांबाबत जनमानसात प्रचंड गैरसमज असतात... उदा. - मंत्रालयातील सहायकला सचिव म्हणणे, RTO inspector ला RTO म्हणणे, एकतर PSI  म्हणणे नाहीतर  डायरेक्ट SP ..मधलं काहीच नाही,  IAS ला आयुष्यभर collector म्हणणे वगैरे.. हे selection grade वगैरे असले(बिनकामाचे!)  प्रकार  तर साहेब सोडून कोणालाच माहीत नसतात.... त्यामुळे समाज आधीच साहेबाला मोठा साहेब  समजत असल्याने(गैरसमजाने का होईना!!) साहेबाला  त्याच promotion झाल हे सुद्धा सांगायची विशेष  सोय राहत नाही...!! काही पद तर शासनात अशी आहेत की जिथं 20-25 वर्ष प्रोमोशनच होत नाही, असल्या साहेबांना तर सार्वजनिक जीवनात प्रोमोशनवर बोलायचीच सोय नाही!!
 बरं promotion चा वेग आणि ज्या पदावर साहेब पदोन्नत होत आहे त्या  पदाच्या अधोगतीचा वेग समानुपाती असतो हे समीकरण तर ठरलेलच, त्यामुळे कामाचं स्वरूपही विशेष बदलत नाही..म्हणजे वरून आलेल साहेब सगळं खालीच ढकलायचा, आता आणखी जरा वरून खालीच ढकलनार एवढंच..... !!
 तरी पण साहेब आपल्या स्टाफ मध्ये तसेच त्याला  नियमित भेटणाऱ्या व्यक्तींसोबत हौसेने चर्चा करून त्यांना सांगत  असतो की आता promotion होणार, एक दोन महिन्यात होणार, थोड्याच दिवसात होणार वगैरे.... दोन महिन्याचे चार महिने,  सहा महिने, वर्ष होऊन जातं पण नुसत्याच चर्चा ....साहेबाला  आता या विषयाचा  पार वीट येतो ...मग साहेब हा विषय काढायचं सोडून देतो..!!   पण आधी साहेबानेच गावं पेटवले असल्यामुळे आता साहेबाला जो येतो तो विचारतो ..कधी होणार.!!.. घरचेसुद्धा गप बसून देत नाहीत ..नेमकं सांगा अजून किती दिवस लागणार.. किती दिवसाच पीठ दळून आणायचं , किती दिवसाचा किराणा आणायचा इथपर्यंत.. !! साहेब हतबल असतो!!..काही साहेब हे सगळं प्रकरण संघटनेवर विनाकारणच  शेकवत असतात, असले साहेब काही झालं की " संघटना काहीच करत नाही" असला बेचव डायलॉग मारून मोकळे होतात(संघटनेसाठी असले साहेब काय करत असतात तो संशोधनाचा विषय असतो पण याठिकाणी त्यावर चर्चा नको, संघटना हा  विषय वेगळ्या लेखात हाताळण्यात येईल.) शेवटी कंटाळून साहेब यावर चर्चा करायचं सोडून देतो..….
या चर्चांमुळे exit mode असलेल्या साहेबाच कामावर लक्ष नसतय आणि हा  साहेब जाणारच आहे हे स्टाफला माहीत असल्याने स्टाफ पण साहेबाने सांगितलेलं जास्त मनावर घेत नाही(एरव्ही देखील ते फार मनावर घेत होते असे काही नाही!!)..अशा अवस्थेत बऱ्यापैकी साहेबाच कार्यालयावरील नियंत्रण सुटलेलं असल्याने साहेबाला सुद्धा प्रोमोशन  होणं अत्यंत आवश्यक असते....
तसे प्रोमोशन हा प्रकार जरी ऐकायला कर्णमधुर वाटत असला तरी   हा प्रकार सगळ्याच साहेबाना आवडतो असा अजिबात भाग नाही..बऱ्याच विभागामध्ये अशी काही पद आहेत ज्यावरून पुढे साहेब प्रोमोशनच घेत नाहीत!! ..कारण काही साहेबांना   सध्या काम करत असलेले पद 'संपन्न' वाटत असल्याने  आणि तेथेच 'लक्ष्मी' कृपा असल्याने  promotion नकोच ही भावना काही साहेबांची असते ..(खरं तर  औदसेला लक्ष्मी म्हणण्याचा प्रकार गंभीर  आणि या 'लक्ष्मी'च  शास्त्रोक्त समर्थन करणे  अजून अतिगंभीर!!) )... तर काहींना चक्राकाराच्या चक्रात मान अडकण्याची भीती वाटत असल्याने promotion नको असते., तर काहींना प्रोमोशनने मिळणाऱ्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कटकटी नको असतात... म्हणजे आमची कोणाला पण साहेब म्हणायची तयारी आहे ..पण खरे 'साहेब' आम्हीच अशी ही promotion नाकारण्यामागची मानसिकता!!
पण हे सगळं चालू असताना   पदोन्नतीसाठी पात्र असलेले साहेबांची त्यासाठी आवश्यक असणारी कागद गोळा करायची लगबग सुरू असते...whatsapp चे नवे ग्रुप तयार होतात.. त्यावर नुसत्या गप्पा... असं करू, तसं करू... पण मुंबईला हेलपाटे मारायला कुणी तयार होत नाही( आणि काही गुपचूप जाऊन येतात ते कुणाला समजून पण देत नाहीत!)..अशा परिस्थितीत दोन चार   अतिउत्साही तथा सध्याच्या पदावर आणि विशेषतः posting ला वैतागलेले अथवा promotion नंतर चांगल्या ठिकाणी already setting लावलेले  असे  साहेब जरा पुढाकार घेऊन नेतृत्व हातात घेऊन मुंबईवाऱ्या करत असतात(असले प्रासंगिक नेते मुंबईकरांनाही आवडतात आणि सहकारी साहेबांणादेखील)....हे नेते मुंबईला जाऊन सर्वांच्या एकत्रित 'शुभेच्छा' देऊन येतात( हे नेतेच पुढील प्रक्रियेमध्ये 'सूत्रांच्या' भूमिकेत असतात)..काही साहेबांना असल्या 'सदिच्छा' त्यांच्या तत्वात बसत नसल्याने त्यात ते सहभागी होत नाहीत..काही साहेबांच्या हे तत्वात बसत असलं तरी कशाला 'सदिच्छा ' वाया घालवायच्या, बाकीच्यांच्या सदिच्छामधून आपला उदधार होणारच आहे  या भावनेतून ते पण सहभागी होत नाहीत......पण एकदा ' सदिच्छा' पोहचल्या की मग प्रशासन गतिमान होते,  प्रोमोशनच्या  प्रक्रियेचा वेग वाढतो, त्रुटींची संख्या आपोआप कमी होऊ लागते, फाईलचा प्रवास  top gear वर चाललेला असतो !! फाईलच्या location ची माहिती रेखांश अक्षांशा सहित सुत्रांमार्फत सगळ्या साहेबाना मिळत असते...सगळं एकदम Pro motion मध्ये!!!!   .(हे 'सूत्र' मात्र सहकारी साहेबांच्या फोनला मात्र पार वैतागून जातात, आणि सहकारी साहेब पण त्यांना जरा बोर झालं तरी काय करावं म्हणून या सूत्राना फोन करून त्यांना पण  बोर करत असतात .)
   एकदाची file clear होऊन येते!!
एवढ्या दिवस  एकजिवाने एकत्रित प्रयत्न करणारे साहेब अचानक  strategic mode वर जातात  आणि वैयक्तिक प्रयत्न सुरू करतात...!! विभागाचे options देण्यासाठी खलबत सुरू होतात, सगळे एकमेकांना पाण्यात पहायला लागतात, कोणीतरी प्रस्ताव मांडतो की आपण सर्वांनी एकत्रित विचार करून विभागाचे preferances भरू पण काही साहेब याला पण हरताळ फासतात..!!. जिथं posting पाहिजे तिथली फिल्डिंग लावण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू होतो... हे साहेब एकमेकांना फोन करून तू कुठे पोस्टिंग  घेतोय वगैरे विचारून अंदाज बांधत  असतात....कोण किती खरं बोलतंय हे शेवटपर्यन्त समजत नाही!!  बरेच साहेब जास्तीत जास्त शिफारस पत्र गोळा करण्याच्या उद्योगात रमून जातात... तर काही साहेबांना असल्या पत्रावळ्यावर  भरोसा नसतो, ते थेट जाऊन एक घाव दोन तुकडे(आपण सुज्ञ आहात!)...हे असले उद्योग  करण्यासाठी बरेच साहेब या अटीतटीच्या काळात  medical leave वर असतात..याच पत्र घे, त्याच पत्र घे, याला भेट त्याला भेट...नुसती लगबग!!!
एकदाची posting ची order येते.. 
थोड्याफार साहेबांच्या मनासारखं झालेलं असतंय.. बाकीच्यांची अखिल महाराष्टात यथेच्छ फेकाफेक...!!
काही साहेब तर ही order आल्याबरोबर पुढच्या posting च planning सुरू करतात!! म्हणजे सेवेसाठी नोकऱ्या की बदल्यांसाठी नोकऱ्या हे सुद्धा कधी कधी समजत नाही...
अशा पद्धतीने साहेब नवीन ठिकाणी रुजू होतो...
आणि मग पुन्हा एकदा नवीन साहेब!!...मला असच पाहिजे, तसच पाहिजे,मी असच करणार, तसच करणार.... आणि मग काही दिवसांनी ... आपलं तस काय नसतय, आपल्याला कसं पण चालतय, तुम्ही म्हणताल तस वगैरे वगैरे!!!
क्रमशः
©गोविंद खामकर
(टीप:  'साहेब सिरीज' मधील यापूर्वीचे सर्व लेख   https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)

Monday, June 20, 2022

रजा

लेख 17 वा: रजा

ऑफिसमध्ये साहेबाला काम सुधरून देईना.. त्यात आठवड्याला 2-3 VC, वरच्या साहेबाच्या meeting, लोकांचे फोन, भानगडी, वरून शनिवार रविवार सुट्ट्या ,  शासकीय सुट्ट्या...कामाला वेळच मिळत नाही!!! साहेब पुरता जॅम झालेला...आणि त्यात पुन्हा कर्मचाऱ्यांच्या रजा!!!!
एकतर  साहेबाच्या ऑफिसला जरा कामाचे फक्त  दोन तीन कर्मचारी, त्यातले एक दोन  जण त्यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाच्या म्हणजे उदा. मेहुण्याच्या  चुलतसासुच्या पुतणीच्या लग्नाला जाण्यासाठी रजेवर... !! ,
साहेबाला लोकांच्या रजा काय सुधरून देत नाही!! त्यात या पाच दिवसाच्या आठवड्याने साहेबाची सगळी बोंब केली...सुट्टीदिवशी साहेब सोडून कुणीच मुख्यालयाला सापडत नाही! आणि आजकाल whatsapp च्या अतिरेकामुळे शनिवार रविवारी असो की शासकीय सुट्टी,  पण कार्यालय अघोषितरीत्या सुरुच असतंय....त्यात अमुक माहिती दोन  तासात पाठवा वगैरे असल्या message आले तर साहेबाचं डोकं जॅम होतंय...अशा वेळी  आता कोणाला ऑफिसला बोलवावं, कोण जास्त  नाटकं न करता येईल याच calculation करून साहेब कोणालातरी येऊन माझ्यावर उपकार कर या भावनेने बोलवत असतो..  तरीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात रजा हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असतो...
घरापासून बऱ्यापैकी  दूर कार्यरत असणारे म्हणजेच चक्राकाराच्या चक्रव्यूहात अडकल्याने  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  टाकलेले तथा फेकलेले अधिकारी शक्यतो  wholesale रजा घेतात. चक्राकाराचं  चक्रव्यूह सदैव भेदण्याची 'कला' प्राप्त झालेले साहेब सदैव योग्य ठिकाणी पोस्टिंग घेऊन  आयुष्याचा बहुतांशी  प्रवास किरकोळ रजेवरच करतात...
घरापासून जरा दूर असलेले साहेब नुसते   calender मध्ये लाल भडक तारखा शोधत असतात. . अशा साहेबाना कॅलेंडरमधील सुट्टीच्या   तारखांचा रंग लाल भडक करण्याचे प्रयोजन काय असेल हे लक्षात येत नाही, किमान शासकीय calender मध्ये तरी त्यांचा  रंग हिरवा अथवा प्रेमळ गुलाबी करायला काय हरकत आहे अशी यांची धारणा असते( कदाचित सरकारी कार्यालयात ज्या जनतेची  कामे pending आहेत त्यांच्यासाठी calender मधील शासकीय सुट्ट्यांच्या रंग लालभडक असावा!!).  मग आठवड्यातील एक दोन  लालभडक तारखा दिसल्या की साहेब आनंदित होतो... मग लगेच ती लालभडक तारीख आणि शनिवार रविवार यादरम्यान किरकोळ रजेच  फुल अलगदपणे   माळून साहेब सुट्टीवर जातो.!! किरकोळ रजा किती घ्यायच्या हे नियमात असलं तरी त्या मोजायच्या नसतात ही धारणा सर्व शासकीय कार्यालयांनी पक्की केलेली आहे., त्यामुळे  वर्षभरात 5-25 किरकोळ रजा घेणारे बरेच तज्ञ साहेब आणि कर्मचारी कार्यालयात असतात. किरकोळ रजा म्हणजे फारच किरकोळ हो!!!  किरकोळ रजेचा अर्ज सुद्धा बरेच कर्मचारी A4 size चा कागद निम्मा फाडून त्यावर करतात.. काही कार्यलयामध्ये सर्व कर्मचारी संगनमताने किरकोळ रजेचे अर्ज दुसऱ्या दिवशी काढून गायब करून टाकतात!!!
याच्या पुढचं version म्हणजे विनातारखेचा अर्ज सदैव देऊन ठेवायचा, एखादा मोठा साहेब चुकून हुकून  अचानक भेट द्यायला आला तर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्याचा हितचिंतक कर्मचारी  तत्परतेने त्या अर्जावर  त्यादिवशीची तारीख टाकून मोकळा होतो!!! 
रजेमध्ये पण सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे medical leave !! हे तर अवघड जागेवरच दुखणं आहे...साहेबाला अशा रजा इच्छा नसताना द्याव्या लागतात, त्यात पण त्या रजा genuine असेल तर ठीक नाहीतर काहीजण timing साधून आजारी पडतात, कुठून तरी certificate घेऊन येतात... मग साहेब check mate होतो...
सगळ्यात हास्यास्पद प्रकार म्हणजे जे प्रामाणिकपणे त्यांच काम पार पाडतात त्यांना रजा मिळत नाही आणि बिनकामाच्याना वरचा साहेब मनमोकळेपणाने रजा देऊन टाकतो... असल्या बिनकामच्यांवर साहेब कधी कधी एवढा 'मेहेरबान' होतो की त्यांना सक्तीच्या रजेवर सुद्धा पाठवतो!!!
साहेब जेंव्हा नवीन असतो तेंव्हा खालचे कर्मचारी अगदी शनिवारी रविवारी,सुट्टीच्या दिवशीसुद्धा   साहेबाला विचारून गावी वगैरे जातात! साहेब जरा जुना झाल्यानंतर मात्र टपालात परस्पर अर्ज टाकून गायब होण्याची प्रथा रुजू लागते. कधी कधी तर एखादा कर्मचारी रजेवर जाऊन 4-5 दिवसांनी माघारी येतो, त्यानंतर त्याच्या रजेचा अर्ज साहेबाच्या हातात पडतो, तेंव्हा साहेबाला समजत की  हा रजेवर गेला होता, गतिमान प्रशासन!! 
रजेसाठी कोणतं कारण दिलं पाहिजे म्हणजे साहेब रजा मंजूर करेल याचा अभ्यास अधिकारी कर्मचारी करत असतात. काही कर्मचारी तर  या रजेपायी कित्येक जवळचे, दूरचे नातेवाईक बिनधास्त scheme लागल्यासारखे मारून टाकतात!!! काही already मेलेले असतील त्यांना पण मरण्याचा second chance देऊन  टाकतात...कधी कधी साहेब विचार करतो याचे एवढे नातेवाईक मेले तरी अजून शिल्लक कसे!!
साहेबाकडे कोणी रजा मागायला आला तर साहेब आपलं उगाच त्याला विचारणार कशाला पाहिजे रजा ,इतके दिवस कशाला पाहिजे, एवढेच दिवस रजा घ्या.. पण साहेबाच्या असल्या dialogue चा काहीच उपयोग होत नाही, कर्मचारी जेवढी रजा घ्यायची तेवढी घेतोच!!! पण याच्या अगदी उलट अस की साहेबाला त्याच्या वरच्या साहेबाकडून रजा मंजूर करायला प्रचंड मेहनत करावी लागते..बऱ्याचदा साहेबाला वेळेवर सुट्टी मिळत नाही, साहेबाला वाटतं मी  कर्मचाऱ्यांना जशा  रजा  देतो तशा  त्याला त्याच्या साहेबाने दिल्या पाहिजे!!   स्वतः साहेब कितीही बेजबाबदार असला तरी तो स्वतःला जबाबदार समजत असतो आणि त्या दडपणाखाली तो स्वतःच रजा घेण्याचं बऱ्याचदा टाळतो!!
बरं साधारणवेळी रजेवर गेलं तर ठीक पण 
कधी कधी अधिकारी कर्मचारी एकदम timing साधून रजेवर जातात, म्हणजे भरपूर pendency झाली की रजा, एखादं क्लीष्ट भानगड समोर येणार आहे असं समजलं की रजा, वरचा साहेब रजेवरून आला की तो पुन्हा हात धुऊन काम करण्यासाठी मागे  लागणार म्हणून रजा वगैरे वगैरे, अशा वेळी साहेब पार हतबल होऊन जातो... सगळ्यात वाईट म्हणजे वरचा साहेब सारखा फोन करून progress विचारत राहतो(दुसरं तो तरी काय करणार!!) आणि खालच्या  साहेबाची so called यंत्रणा (आपल्याकडील त्रोटक ,अकुशल मनुष्यबळाला यंत्रणा का म्हणतात हे साहेबाला अजून समजलेल  नाही!  किमान एकाच पाण्यातील माशांनी अशी 'यंत्रणा' म्हणून थट्टा करू नये असे साहेबाला वाटत असते) म्हणजे कामाचे एक दोन कर्मचारी रजेवर गायब... साहेबाला हे सांगायची तर सोयच नाही की अमुक व्यक्ती रजेवर असल्याने मला अडचण येत आहे वगैरे... आणि जर चुकून साहेबाने वरच्या साहेबाला सांगितलच की अमुक व्यक्ती रजेवर आहे तर वरचा साहेब त्याला ' तुमची बाकीची यंत्रणा कामाला लावा' असला dialogue मारून मोकळा होतो... साहेब पण Yes Sir म्हणतो!!
काही काही साहेब  तर अद्भुत असतात, ते रजाच घेत नाहीत! अगदी शनिवार रविवारी पण हे  कामावर!! म्हणजे अस काय 'समाधान' त्यांना यातून लाभत याचा शोध घेतला पाहिजे..असले  साहेब retirement नंतर वेळ कसा घालवतात हे पण  पाहिलं पाहिजे..काही काही साहेब सेवनिवृत्तीच्या आधी 5-10 वर्षे जरा कमी सुट्ट्या घेऊन रजा रोखीकरनाचा लाभ मिळवतात आणि 5 वर्षे लवकर मरतात!! 
बरं  चुकून साहेबाला रजा मिळाली आणि साहेब रजेवर गेला तरी आज काल social media चा अतिरेक एवढा वाढलाय की साहेबाला office चे phone सुधरून देत नाही!!साहेब रजा घेऊन कुठं फिरायला गेला तरी या फोनमुळे तिथंच ऑफिस सुरू होऊन जातं!!  फिरायला नेलेली बायका पोरं साहेबाच्या फोनला वैतागून जातात..( हे प्रकरण साहेबाने कौशल्याने हाताळले नाहीतर जड जाऊ शकते !!)...
काही खाजगी अस्थापणामध्ये कर्मचाऱ्यांच  मानसिक संतुलन चांगलं राहावं यासाठी त्यांना compulsory  रजा दिली जाते, शासनाकडून एवढी  नाही पण किमान गरजेच्यावेळी हक्काने रजा मिळावी एवढी अपेक्षा!!!
क्रमशः
©गोविंद खामकर
(टीप: यापूर्वीचे सर्व 16 लेख  https://gamatijamati.blogspot.com  या link वर   उपलब्ध आहेत तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत app वर देखील उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)

Saturday, April 23, 2022

16. साहेबाच ऑफिस

लेख 16 वा:  साहेबाच ऑफिस

साहेबाच ऑफिस कुठे असावं कुठे असु नये याबाबत बरेच मतप्रवाह असले तरी ते वर्दळीच्या ठिकाणाहून म्हणजे बस स्टँड, बाजार इ. पासून दूर असलं पाहिजे म्हणजे 'बिनकामाचे' लोक ऑफिसला येत नाहीत असा सार्वत्रिक गैरसमज पक्का आहे!!! खरं तर ज्याला यायचंयचं तो कुठं पण येतो हे बऱ्याच लपाछपीच्या प्रयोगानंतर सिद्ध झालेलेच आहे!!  साहेबाच ऑफिस स्वच्छ, सुंदर असावा की बकाल, ओसाड याबाबतही बरेच मतप्रवाह आहेत... ज्यांना त्यांच्यातला साहेब जिवंत ठेवायचा आहे त्यांना स्वच्छ सुंदर कार्यालय आवडत तर ज्याना प्रशासनात सिद्धी प्राप्त झाली आहे,  प्राप्त करायची आहे त्यांना कसलं पण ऑफिस चालतं(ते कुठेही चांगली batting करू शकतात... वयनिरपेक्ष, पदनिरपेक्ष, स्वयंसिद्ध!!).
        कार्यलयीन वेळेच्या बाबतीत साहेबाची माफक अपेक्षा एवढीच  असते की मी सोडून सगळ्यांनी वेळेवर कार्यालयात आलं पाहिजे!! कारण साहेबाला बाहेरची ,field वरची बरीच कामे असतात.!.. पण सगळ्याच कर्मचाऱ्यांना मात्र वेळेवर कार्यालयात येणारा साहेब आवडतो असे अजिबात नाही, कारण त्यांना पण वेळेत यावं लागेल !(असा गैरसमज!!). पण काही दिवसांनी साहेब त्या कार्यालयात जुना झाल्यावर साहेबाची पोथी सगळ्यांनी ओळ्खलेली असते , त्यामुळे साहेब वेळेवर आला तरी कर्मचारी वेळ पाळत नाहीत आणि  साहेबही त्यांचं विशेष काही करत नाही हे पण विशेष आहे! साहेब लवकर येऊनही   कर्मचारी  उशिरा येत असल्याने ते साहेबाला फारच awakrd वाटते, त्यामुळे अशी परिस्थिती उदभवू   नये म्हणून साहेब उशिराच येणे पसंद  करतो...काही काही कर्मचारी साहेब कधी पण येवो स्वतः मात्र वेळेत ऑफिसला  येऊन वेळेत घरी जातात त्यांना सलाम...
       साहेबाच ऑफिस 80:20 तत्वावर चालत, म्हणजे 20% कामाचे ,बाकीचे दिवस काढायला आलेले... साहेब पण 80% इकडं तिकडं 20% ऑफिसात...!!
साहेब त्या ऑफिसचा कुटुंबप्रमुख असल्याने साहेबाला कसली कसली प्रकरण हाताळावी लागतील याचा भरोसाच नाही..!! .म्हणजे पार एखाद्या कर्मचाऱ्याच्या मामाच्या पोराच्या पोराचं लग्न attend करण्यासाठी पण साहेबाला आग्रह  धरला जातो!!(साहेब एवढा रिकामा असतो का? काय माहिती.. असू पण शकतो). सर्वात महत्त्वाच म्हणजे ऑफिसमधील प्रत्येकाला वाटत साहेब मलाच खूप काम सांगतात, त्याला काहीच सांगत  नाही...अशा लोकांचे 'गैरसमज' साहेबालाच दूर करावे लागतात( गैरसमज हाच की तुमच्यातल एक पण कामाचं नाही!!) .कार्यालयात रिम, toner, printer, computer, internet connection यावरून नेहमी कुरबुर सुरू असते!! या समस्यांना फारच थोडे शासकीय  कार्यालये अपवाद असतील!! त्या computer मधलं त्या कर्मचाऱ्याला type करायचं सोडून काहीच समजत नाही  पण त्याला  computer एकदम भारीतला पाहिजे, वरून त्या computer ला password वगैरे  टाकून एकदम शासनाने  तो computer  आहेरामध्ये त्यालाच देऊन टाकल्यासारखा  अविर्भाव !!! कारण काय दिले जाते तर त्यात महत्वाच्या files आहेत वगैरे! शासनाच्या file मध्ये लपून ठेवण्यासारखं काही शिल्लक राहिलंय अस मला तरी काही वाटत नाही....बरं यातलं काही कमी पडल की चालले साहेबांकडे... रिम नाही, toner नाही, antivirus नाही, net slow आहे , माझे मागचेच xerox चे  बिलं अजून निघले नाहीत वगैरे....मोठे मोठे साहेब या असल्या मुलुभूत प्रश्नावर check mate होताना मी डोळ्यांनी पाहिलंय..!!!  मग साहेब    म्हणतो असले फालतू फालतू विषय माझ्याकडे आणायचे नाहीत( पण actually साहेबाकडून हे छोटे छोटे विषय पण सुटत नाहीत हे सत्य असतं!!)
     कार्यलयामध्ये काही modern भाट  असतात जे कायम साहेबाची सतत  स्तुती करत असतात.. साहेब हा color तुम्हाला छान दिसतो, साहेब तुमची personality लै भारी आहे, तल्लख बुद्धी, निडर  वगैरे वगैरे.... खरं एवढ्या रापलेल्या चेहऱ्यामागच सौदर्य पाहण्याची सौंदर्यदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते की त्याचा उद्देश दुसराच काही असतो त्याच त्याला माहिती.!... पण सामान्यपणे ही स्तुतीसुमने उधळणाऱ्या व्यक्तीना फक्त साहेबामधेच सौन्दर्य का  दिसत यावर साहेबाने गांभीर्याने  विचार करायला हरकत नाही... पण अशा व्यक्ती या साहेबाच्या जवळच्या असतात असा गैरसमज असल्याने त्यांच्या  जास्त नादी कोणी लागत नाही!!
   साहेब जर कार्यलयात येणाऱ्या लोकांशी जरा  नीट बोलत असेल तर बहुतांशी कार्यालयातील  कर्मचारी त्यांच्याकडे आलेले  visitor साहेबांकडे पाठवून पाठवून देऊन मोकळे होतात, म्हणजे अगदी त्याला काही सांगायचा कंटाळा आला तरी तो काहीतरी अर्धवट सांगणार आणि वरून सांगणार वाटल्यास साहेबाला भेटून घ्या!! काही काही साहेबाना त्यांच्याकडे जास्त लोक आलेलं आवडत नाहीत, त्यामुळे तो खालच्याना सांगून टाकतो की  माझ्याकडं विनाकारण  कुणी आलं तर तुमची खैर नाही , त्यावेळी खालचा कर्मचारी कसाबसा किल्ला लढवायचा प्रयत्न करतो पण visitor ला पण साहेबाला भेटल्याशिवाय त्याचा हेलपाटा कारणी लागला असे वाटत नाही(पण शेवटी हेलपाटाच!)
काही काही कर्मचारी visitor आला की त्याच्याकडे बघतच नाहीत, Zero eye contact.!!...अशाने visitor वैतागून जातो(त्याला वैतागून सोडणे हा पण उद्देश असू शकतो!!)...मग कधीकधी त्या visitor चा पण बांध फुटतो, शाब्दिक चकमक होते... पण अशा चकमकींची सवय झालेली असल्याने  कर्मचाऱ्यांना याचा काहीच फरक पडत नाही..
कार्यालयामध्ये साहेब बेल मारून शिपायाला  बोलवुन सांगणार अमुक अमुक कर्मचाऱ्याला बोलावून आन लगेच शिपाई सांगणार साहेब ते चहा घ्यायला गेलेत!! सारख चहा ला जाणारे कर्मचारी  'चहा पाण्याचे' सगळे पैसे  प्रामाणिकपणे खरंच चहावरच  खर्च करतात का इथपर्यंत शंका येते..
बरं दुसऱ्या एखाद्याला बोलवायला सांगितले तर तो तिसऱ्याच टेबलला गेलेला... या टेबल कडून त्या टेबल कडे मग तिथला कर्मचारी तिसऱ्याच टेबल कडे असा संगीतखुर्चीचा कार्यक्रम दिवसभर चालू असतो... बरं हे कर्मचारी गप्पा काय मारतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे... म्हणजे युक्रेन युद्धापासून तर ह्याच आणि हीच कायतरी चाललंय इथपर्यंत सगळं cover करायचं पण ऑफिसमधील कामाबाबत चर्चा कटाक्षाने टाळली जाते!!
दुपारी जेवणाची सुट्टी कधी असावी याबाबत शासन निर्णय आहेच पण त्याची दखल कुणीच घेत नाही, खुद्द साहेब पण घेत नाही..!!.बरेच कर्मचारी सकाळीच जेवण करून येऊन दिवसभर 'चहा पाण्यावरच ' असतात...साधारणपणे  दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान हा भोजन सोहळा चालू असतो, या काळात साहेबाने कोणालाही बोलावलं तरी तो जेवायलाच गेलेला असतो!(नेमकं जेवायला जातो की गावजेवण घालायला जातो हे साहेबाला समजत नाही!).
कधी कधी  सहजच एखादा नेता,  कार्यकर्ता, पत्रकार इ.   साहेबाकडे येतो... तो सरळ सांगतो यापूर्वी जे साहेब होते  त्यांचं आम्हाला फार सहकार्य असायचं!! जुना साहेब एवढ्या सगळ्यांना 'सहकार्य' कसा करायचा हा प्रश्न साहेबाला शेवटपर्यंत सुटत नाही.
त्यांना साहेब कधी कधी विचारतो काही चहा वगैरे घेणार  का, मग न्हाय व्हय करता करता प्रकरण black tea जवळ येऊन मिटत!! नंतर इकडच्या तिकडच्या चर्चा( निव्वळ बिनकामच्या!!)..चर्चेचे विषय संपले तरी चहा येत नाही, तो मध्येच म्हणणार ,बरं जाऊद्या साहेब येतो आता,चहा नंतर घेऊ कधीतरी .. साहेब पण म्हणणार (फारच उथळ मनाने!) न्हाय आता चहा घेऊनच  जा!…चहा ला होणारा delay दोघांनाही असह्य होतो....त्यामुळे चहा सांगताना साहेबाने दरम्यानच्या काळात हे प्रकरण कसं हाताळावे याचा विचार पण केला पाहिजे!! काही ऑफिस मध्ये चहाच मशीन लावण्याचा प्रयोग काही  साहेबानी केला पण काही हौशी लोक चहासाठी साहेबाकडे यायला लागले!! विनाकारण OPD वाढली!! त्यामुळे बऱ्याच साहेबानी चालू मशीन काढून टाकलं!
हल्ली प्रत्येक कार्यालयात  Birthday नी पण धुराळा केलाय.!!..Birthday असला  की  ऑफिसमध्ये celebrate  होणारच.. पण जर  birthday सुट्टीच्या दिवशी आला तर त्याला साधा कोणी फोन सुद्धा करणार नाही !!! म्हणजे   Birthday च कौतुक फक्त कार्यालयीन वेळेतच!!  ज्या कर्मचाऱ्याला  एरव्ही कोणी काहीच विचारत नाही त्याला म्हणजे  'Birthday Boy' ला (अगदी वयनिरपेक्ष भावाने!!)    birthday दिवशी मध्ये  उभा करायचा, मग cake आणून कापायचा, नंतर संध्याकाळी  त्यालाच कापायचा!(याचसाठी केला होता अट्टाहास?)..त्यात birthday ला wish करताना अजून awkward परिस्थिती निर्माण होते, कारण cake कापताना एकदम गाण्याच्या सुरात Happy Bithday Dear अमुक तमुक म्हणताना 'Dear' शब्दाजवळ थोडासा break लागतोच!!  याला/हिला dear म्हणू की नको असा विचार करत असतानाच ही घटिका टळून जाते!!!(पण ज्याना dear म्हणायचच आहे ते म्हणून पण टाकतात!!)..(कृपया आपल्या कार्यालयात एखाद्याचा birthday असेल तर या लेखाची आठवण येऊ देऊ नये!!बिनधास्तपणे व्यक्त व्हा ही विनंती!!).
म्हणजे कार्यालयातील कामाचा वेळ(तसा बिनकामाचा!) असाच कसातरी timepass करण्यासाठी  घालविण्यासाठी सर्वांची धावपळ असते! असच एखाद्या उत्सवानिमित्त काही कार्यालयात मूर्तीची स्थापना करण्याची प्रथा आहे...मग सकाळी 10:30 ला आरतीला सगळे एकत्र येणार , नंतर तिथंच प्रसाद वाटप ,गप्पा टप्पा वगैरे.... तासभर घालवायचा... संध्याकाळी तसच....एकदा माझ्या कार्यालयातील कर्मचारी माझ्याकडे उत्सवानिमित्त मूर्ती स्थापण्याचा प्रस्ताव घेऊन आले, मी म्हणालो  आरतीची वेळ सकाळी कार्यालय सुरू होण्यापूर्वी आणि सायंकाळी कार्यालय संपण्याच्या नंतर असेल .... बस... संपला विषय....भक्ती, भाव कुठं गेला माहीत नाही पण परत तसा प्रस्ताव घेऊन माझ्याकडे कुणीच आलं नाही!!!
त्यात जर एखादं दोन दिवस साहेब रजेवर असेल तर मग साहेबाच ऑफिस नंदांवणासारखं फुलून येत... ज्याला जस वाटलं तसं... आनंदी आनंदी!!
तस संध्याकाळची वेळ झालेली असेल तर कुणाचं कुठंच मन लागत नाही, सगळ्यांना घरी जायची घाई... साहेब ऑफिसला नसेल आणि येण्याची काही लक्षणे नसतील तर लवकरच कल्टी मारता येते... काही ऑफिसमध्ये biometric attendance असल्यामुळे परतीचे सगळे दोर कापले जातात,अगदी शेवटच्या मिनिट म्हणजे शेवटच्या मंगलअष्टकासारखाच !! त्या biometric machine जवळील गर्दी सगळे ऑफिसच्या कामासाठी किती दर्दी आहेत याची साक्ष देत असते!! 
     असाच आला दिवस निघून जातो, उद्याचाही बहुदा तसाच जाणार!! साहेबाच्या मागे असलेला प्रचंड follow up, सारखे whatsapp चे messages, दौरे , आढावा बैठका याचा ताण... आणि असल निवांत  साहेबाच ऑफिस...साहेब धन्य होतो...!! 
(टीप: सदर लेखनप्रपंच हा निव्वळ विनोदबुद्धीने  केलेला असून त्याला तुम्ही काल्पनिक समजू शकता,कुणाच्याही भावना दुखावण्याचा यामागे उद्देश नाही... सध्या शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा ताणतणाव कमालीचा वाढत आहे याची जाणीव मला  आहे)
(यापूर्वीचे सर्व लेख सोबत दिलेल्या link वर उपलब्ध आहेत, तसेच आमचे मित्र ओमप्रकाश यादव साहेब यांच्या ग्रामविकास दूत App वर देखील हे सर्व लेख उपलब्ध आहेत)

©गोविंद खामकर

Wednesday, April 20, 2022

साहेबाची VC

लेख 15 वा: साहेबाची VC

गेली दोन वर्ष covid ने नुसता धुमाकूळ घातला. त्याचे पडसाद  समाजातील सर्वच घटकावर पडले, तसे प्रशासनावर पण पडले. याच काळात VC च पीक लै जोरात  आलं. उठसूट VC करून करून साहेब ,कर्मचारी हैराण झाले....
सुरुवातीला म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी  VC हा विषय फक्त वरच्या मोठया मोठ्या साहेबांपर्यंत सीमित होता. जर एखाद्या साहेबाने सांगितलं की मला आज 3:00 वाजता VC आहे तर त्याच्याकडे जरा वेगळंच पाहिलं जायचं. साहेब VC मध्ये असताना कोणाचाही फोन जरी आला तरी साहेब हळू आवाजात बोलून सांगणार VC चालू  आहे तरी समोरची व्यक्ती कोणताही प्रतिप्रश्न न करता गुपचूप phone ठेवायची... म्हणजे थोडक्यात काय तर VC म्हणजे एकदम elite class feeling !!!
पण covid मध्ये VC च प्रचंड अब्रुनुकसान झाल, इज्जतच राहिली नाही., literally सांगायचं तर आता vc ला कुत्रं सुद्धा खात नाही....   covid ने तर VC पार तळागाळात पोहचवली(तशी रसातळाला पण नेली!).
 मोठ्या साहेबाना VC भरपूर असतात पण VC जॉईन करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी अजून एक दोन शतके सुटतील असं अजिबात वाटत नाही! म्हणजे VC जर मध्येच disconnect झाली आणि जवळ त्यातला कोण तज्ञ नसेल तर साहेब एकदम panic होतो. VC जरी वेळेवर सुरू झाली तरी VC घेणारा मुख्य साहेब सगळे join झालेत का याची खात्री करून घेतल्याशिवाय VC ला येत नाही. मुख्य साहेब येत नाही तोपर्यंत तिथला कोणीतरी उगाच बसून काय करावं म्हणून attendance घ्यायचं नाटक सुरू करतो, पण त्याला खालचे साहेब काही जास्त भाव देत नाहीत. मग मुख्य साहेबांची entry होते आणि खालचे जे साहेब अद्याप join नव्हते ते पटापट join होतात( म्हणजे मुख्य साहेब आधी खालचे साहेब नंतर ही परंपरा कायम आहे!).
मग VC सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे करून घेतो, उद्या करतो, थोडं राहीलय असली नेहमीची फेकफेकी सुरू होतेच(दुसरं VC मध्ये असतंय तरी काय?!!)पण आता VC दर 2-3 दिवसानी होत असल्याने साहेबांचा फेकफेकीचा scope बराच कमी झालाय. त्यामुळे त्यातली त्यात साहेबाला थोडं alert राहावं लागतंय. दुसरा VC चा फायदा म्हणजे साहेबाला headquarter (Head आणि Quarter यांचा जवळचा संबंध आहे असं कोणी समजू नये!) सहजासहजी सोडता येत नाही, नाहीतर साहेब कधीपण गायब होऊन कधी पण उगवायचे! शिवाय 10-15 मिन च्या VC साठी कार्यालयातून जिल्ह्याला जाऊन  तिकडेच दिवसभर बोंबलत हिंडण्याची प्रथा सुद्धा लोप पावत आहे...!!
वरचा साहेब खालच्या साहेबांची VC घेत असेल ती थोडीशी शिस्तबद्ध असते पण  खालचा साहेब जेंव्हा त्याच्या खालच्या field वरील कर्मचाऱ्यांची VC घेतो तेंव्हा तमाशा पाहण्यासारख्या असतो!!
पाहिले 10 मिनिटे तर कुणालाच कुणाचं काहिच सुधरत  नाही..मधीच कुणीतरी screen share करणार, कुणी जॉईन होतय तर कुणी left होतंय, नुसते कर्णकर्कश , भांड्याकुंड्याचे आवाज, कुठे कुत्रे भुंकल्याचा आवाज , भांडण , कुणाची 'अतिसंवेदनशील' चर्चा, कोण साहेबाला शिव्या देतय वगैरे असलं काहीपण ऐकायला येतंय....जोपर्यंत मध्येच विनाकारण  mike चालू करणे, unmute ठेवणे  आणि तत्सम प्रकार हे Non bailabale , cognizable offence ठरवले जात नाही तोपर्यंत परीस्थिती सुधारेल अस अजिबात चित्र नाही!!     .…जिथं 100 जण जॉईन होणं अपेक्षित आहे तिथं 30-40 च्या पुढं आकडा जात नाही...
मग साहेब जॉईन होतो. एकंदरीत हा सगळा तमाशा पाहून साहेब आधीच हतबल झालेला असतो, त्यात ज्यांचे mike चालू असतात ते सगळे Vivo11, SK, sSamy ,Tomy असल्या कसल्या पण नावाने जॉईन असतात त्यामुळे नेमकं सांगावं कुणाला ते पण सुधरत  नाही.. साहेब 2-4 जणांना सांगून पाहतो नंतर नाद सोडून देतो!! VC ला join झालेल्यांची संख्या फारच निराशाजनक असते, त्यामुळे field वरील लोकांच्या VC ह्या 100% उपस्थितीऐवजी  Quorum तत्वावर होण्याबाबत शासनाकडून एखादं परिपत्रक निघणे आवश्यक वाटते...एवढं झाल्यावर मग साहेब जे जे अनुपस्थित आहेत त्यांना नोटीस काढून त्यांचे खुलासे घेण्याचं फर्मान सोडतो आणि VC सुरू करतो( खरं तर प्रशासनामध्ये  निघालेल्या नोटिसंच पुढं काय होत यावर PhD होऊ शकते, आणि काय हरकत आहे करायला ,नाहीतर copy paste करून PhD मिळविणारे बरेच आहेत!!!).

एकंदरीत one to one आढावा घेण्याच्या mode मध्ये असलेला साहेब एकदम भाषण mode मध्ये येतो, सगळे विषय भराभर उरकून घेतो. साहेब कुणालाही काही विचारत नाही कारण ज्याला विचारलं तो कसाबसा mike सुरू करतो पण पुन्हा बंदच करत नाही, त्यामुळे वातावरण अजून बिघडते..
सगळ्यांना mute करून साहेब ( Host) कधीकधीVC घेतो पण मग फिल्डवरचे VC join करून ठेऊन देतात आणि आपली नेहमीची बिनकामाची कामे करत बसतात! त्यामुळे VC चा उद्देश सफल होत नाही....
त्यामुळे खरं तर   VC कशी join करायची, mute, unmute कसं करायचं, video चालू  बंद कसा करायचा याच mass training(शक्यतो शासकीय प्रशिक्षण संस्था नकोच!) घ्यायला पाहिजे पण ते  सुद्धा VC वर नको , प्रत्यक्षच!!!..नाहीतर तिथं पण तोच तमाशा होणार... !!!!
क्रमशः

©गोविंद खामकर
(टीप: यापूर्वीचे सर्व 14 लेख याच page वर उजव्या बाजूला उपलब्ध आहेत
#साहेब सिरीज)



 

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...